Aditya L1 Update : आदित्य L 1 बाबत इस्रो ने दिली मोठी माहिती ; जाणून घ्या अजून किती लागणार कालावधी

स्विस उपकरणाने दोन दिवसांच्या काळातील सूर्याच्या किरणांचा अभ्यास करुन, त्यातील प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल काउंटमधील फरक नोंदवला आहे.

111
Aditya L1 Update : आदित्य L 1 बाबत इस्रो ने दिली मोठी माहिती ; जाणून घ्या अजून किती लागणार कालावधी
Aditya L1 Update : आदित्य L 1 बाबत इस्रो ने दिली मोठी माहिती ; जाणून घ्या अजून किती लागणार कालावधी

भारताची पहिली सौर मोहीम असणाऱ्या ‘आदित्य एल-1’ बाबत इस्रो (ISRO) ने शनिवारी आदित्य L 1 मोहिमेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.आदित्य उपग्रहावर असणाऱ्या आणखी एका उपकरणाने आता सूर्याचा अभ्यास करण्यास सुरूवात केली आहे. सोलार विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) असं या उपकरणाचं नाव आहे. या डिव्हाईसने आता महत्त्वाचा डेटा रेकॉर्ड केला आहे. हिस्टोग्राम २ दिवसांत सोलर विंड आपन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) द्वारे टिपलेल्या प्रोटॉन आणि अल्‌फा कणांच्या संख्येतील उर्जा भिन्नता दर्शवितो. अशी माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत x अकाऊंटवर पोस्ट करत दिली आहे. (Aditya L1 Update)

देशाची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. स्विस उपकरणाने दोन दिवसांच्या काळातील सूर्याच्या किरणांचा अभ्यास करुन, त्यातील प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल काउंटमधील फरक नोंदवला आहे. यामुळे आता आदित्य उपग्रहावरील दोन उपकरणे अगदी सुस्थितीत असून, अपेक्षेप्रमाणे काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Aditya L1 Update)

(हेही वाचा : Central Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता ५० टक्क्यांंपर्यंत वाढण्याची शक्यता)

 

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य हे यान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. या ठिकाणाहून आदित्य यान 24×7 सूर्याचा अभ्यास करू शकणार आहे.

लवकरच अपेक्षित ठिकाणी पोहचणार
आदित्य यान हे एल-1 लॅग्रेंज पॉइंटवर कधी पोहोचणार याबाबत इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली. ते म्हणाले, की सर्व क्रियाकल्प पार पाडून आदित्य यान हे ७ जानेवारी २०२४ रोजी एल-1 पॉइंटवर पोहोचू शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.