President Droupadi Murmu: नव्या वाटा शोधण्यासाठी ‘एआय’ ची गरज

पंतप्रधान जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल माध्यमातून नोंदवण्यात येत आहेत, ही केंद्र शासनाची कामगिरी कौतुकास्पद आहे.

91
President Droupadi Murmu: नव्या वाटा शोधण्यासाठी 'एआय' ची गरज
President Droupadi Murmu: नव्या वाटा शोधण्यासाठी 'एआय' ची गरज

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सुविधा जनतेला सहजरित्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या क्षेत्रात नव्या वाटा शोधण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)सारख्या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी अग्रणी भूमिका बजावली पाहिजे,’’ असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी नागपूर शनिवारी (१ डिसेंबर) येथे केले. (President Droupadi Murmu)

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, की पंतप्रधान जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल माध्यमातून नोंदवण्यात येत आहेत, ही केंद्र शासनाची कामगिरी कौतुकास्पद आहे. १९४७ मध्ये स्थापन झालेल्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देणारे डॉक्टर तयार झाले आहेत. ही ‘मेडिकल’ची जमेची बाजू आहे. (President Droupadi Murmu)

आरोग्याच्या क्षेत्रात आजही असमानता दिसून येत असल्याची भावना व्यक्त करीत यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने विमा आरोग्य योजना सुरु केली आहे. या योजनांचा मोठा आधार गरिबांना मिळाला आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी माजी विद्यार्थिनी डॉ. शकुंतला गोखले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेल्या अत्याधुनिक लेक्चर हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते झाले. (President Droupadi Murmu)

(हेही वाचा : Aditya L1 Update : आदित्य L 1 बाबत इस्रो ने दिली मोठी माहिती ; जाणून घ्या अजून किती लागणार कालावधी)

अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते. अमृत महोत्सवी सोहळ्याचे स्वागताध्यक्ष उपमुख्यमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये हेही यावेळी उपस्थित होते. (President Droupadi Murmu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.