इंदिरा गांधींची संपत्ती मिळवण्यासाठी राजीव गांधींनी काय केला होता प्लॅन? PM Narendra Modi यांचा मोठा गौप्यस्फोट

143
इंदिरा गांधींची संपत्ती मिळवण्यासाठी राजीव गांधींनी काय केला होता प्लॅन ? PM Narendra Modi यांचा मोठा गौप्यस्फोट

कॉंग्रेस सध्या आपली बाजू जनतेसमोर स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पण अगोदरच्या चुकीच्या कृत्यामुळे कॉंग्रेसचे पितळ उघडं पडत आहे. कॉंग्रेसचे राजकुमार (Congress) सध्या देशभरात प्रचारसभा घेऊन सांगत आहेत की, आता तुमच्या मालमत्तेचा एक्स-रे होणार. एक्स-रे करून लोकांना लुटण्याचा प्लॅन आखत आहेत. एवढेच नाही, तर हे जिवंतपणी तर सोडाच, पण मृत्यूनंतरही आपल्या पश्चात राहिलेली संपत्ती, जी आपल्या मुला-मुलींना मिळायला हवी, तीही आपण देऊ शकणार नाही. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या टीकेवर पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील मुरेना येथील सभेत प्रतिउत्तर देत मोठे गौप्यस्फोट केला. (PM Narendra Modi)

(हेही वाचा –Role of female voters : कोकणात महिला मतदारांची भूमिका महत्वाची )

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Ex Pm Indira Gandhi) यांचे निधन झाल्यानंतर, त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. मात्र, पूर्वी एक असा कायदा होता, की त्या संपत्तीचा एक भाग त्यांना मिळण्यापूर्वी, सरकार घेत होते. तेव्हा चर्चा होती की, इंदिरा गांधी यांच्या पश्चात त्यांची प्रॉपर्टी त्यांचा मुलगा राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांना मिळणार होती. आपली प्रॉपर्टी वाचविण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधी जो Inheritance (वारसा) कायदा होता, तो संपुष्टात आणला आणि आपली संपत्ती वाचवली. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, मध्य प्रदेशातील मुरैना येथे केले. (PM Narendra Modi)

काँग्रेसची लूट म्हणजे, ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ 

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा स्वतःवर आले तेव्हा कायदा बदलला आणि आता ते प्रकरण संपल्यानंतर, पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी हे लोक तोच कायदा अधिक कडक करून परत आणण्याच्या विचारात आहेत. आपण आपल्या कुटुंबाची चार-चार पिढ्यांची संपत्ती बिना टॅक्सची मिळवली आणि आता सर्वसामान्य जनतेच्या संपत्तीवर, कष्टाच्या कमाईवर टॅक्स लावून अर्धी संपत्ती लुटण्याचा विचार आहे. यामुळेच काँग्रेसची लूट म्हणजे, ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’. (PM Narendra Modi) अशी स्थिती असल्याचे मोदी म्हणाले.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.