आता Supreme Court मधील याचिकांच्या सुनावण्यांचे अपडेट Whatsapp वर येणार; सर्वोच्च न्यायालयाची घोषणा

196

सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आता यापुढे व्हॉट्सअपवर केससंबंधी मेसेज पाठवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी महत्वाची घोषणा केली. यापुढे दाखल केसेस, सुनावणी होणाऱ्या केसेस यांची व्ह़ॉट्सअपरवर वकिलांना यादी पाठवली जाणार आहे.

Whatsapp मेसेजिंग सेवा

“व्हॉट्सअप मेसेंजर हा आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक सेवा असून, संवादाचे प्रबळ माध्यम ठरले आहे. न्याय मिळण्याचा अधिकार अधिक बळकट करण्यासाठी आणि न्यायव्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने Whatsapp मेसेजिंग सेवा न्यायालयाच्या IT सेवांसोबत एकत्रित करण्याची घोषणा केली आहे, असे (Supreme Court) सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले.

याचिकांची बोर्डवरील यादी मिळणार 

न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याचिकांमुळे उद्भवलेल्या एका जटिल कायदेशीर प्रश्नावर सुनावणी सुरू होण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी ही घोषणा केली. आता वकिलांना केस दाखल करण्याबाबत स्वयंचलित संदेश प्राप्त होतील. याव्यतिरिक्त, बारच्या सदस्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्याची यादी प्रकाशित होताच प्राप्त होईल.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : काँग्रेस-माकपातील भांडणाला जनता कंटाळली; केरळात भाजपाला संधी)

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले की, “ही सुविधा आणि सेवा आपल्या रोजच्या कामाच्या सवयींमध्ये मोठा बदल आणेल. तसेच यामुळे कागदाचा आणि आपल्या पृथ्वीला वाचवता येईल”. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या निर्णयावर व्यक्त होताना हा आणखी एक क्रांतीकारक निर्णय असल्याचं सांगितलं आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) अधिकृत अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक ८७६७६८७६७६ शेअर केला असून यावर कोणताही संदेश किंवा कॉल स्वीकारणार नाही हे स्पष्ट केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.