Role of female voters : कोकणात महिला मतदारांची भूमिका महत्वाची

97
Role of female voters : कोकणात महिला मतदारांची भूमिका महत्वाची
Role of female voters : कोकणात महिला मतदारांची भूमिका महत्वाची
  • सुजित महामुलकर

एकीकडे राजकारणात पुरुषांची मक्तेदारी वाढत असताना, राज्यातील तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ११ मतदार संघातील निवडणुकीत कोकण विभागात महिला मतदारांची ( female voters) संख्या पुरुषांपेक्षा ( अधिक असल्याचे निवडणूक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तर प्रगत विभाग समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील अन्य मतदार संघात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे. (Role of female voters)

(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईत महिलांना प्रतिनिधित्व नाही )

रायगडमध्ये २७ हजार महिला जास्त

कोकण विभागात रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदार संघ आहेत. यातील रायगड मतदार संघात एकूण १६.६८ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत, त्यापैकी ८.२० लाख पुरुष तर ८.४७ लाख महिला, म्हणजे महिला मतदारांची (female voters) संख्या २७ हजाराने अधिक आहे. रायगड मतादार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार) सुनील तटकरे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे अनंत गीते निवडणूक रिंगणात आहेत. (Role of female voters)

रायगड-सिंधुदुर्गात महिला मतदार २१ हजाराने अधिक

कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे महत्वाचे मानले जातात. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा मिळून एक लोकसभा मतदार संघ तयार झाला असून या मतदार संघात एकूण मतदार १४.५१ लाख आहेत. यापैकी ७.१४ लाख पुरुष असून जवळपास २१ हजाराने महिला मतदार अधिक, म्हणजेच ७.३६ लाखाहून जास्त आहेत. या मतदार संघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे. (Role of female voters)

(हेही वाचा- lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये यादवांत महाभारत)

महिला मतदारांचा टक्का महत्वाचा

या दोन्ही मतदार संघात ‘कांटे की टक्कर’ असून मतदानामध्ये महिला मतदारांचा टक्का हा अत्यंत महत्वाची भूमिका बजाऊ शकतो, यात शंका नाही. या दोन्ही मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे, २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. (Role of female voters)

(हेही वाचा- ध्वनी तरंगांचा शोध लावणारे इटालियन संशोधक Guglielmo Marconi)

संख्या जास्त, मतदान कमी

दरम्यान, पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदार संघात १९ एप्रिलला झालेल्या मतदानात भंडारा-गोंदिया मतदार संघातही महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे, मात्र मतदान करण्यात पुरुष मतदार आघाडीवर आहेत. ९.०९ लाख पुरुष मंतदारांपैकी ६.२६ लाख मंतदारांनी मतदान केले तर एकूण ९.१७ लाख महिलांपैकी ५.९८ लाख महिला मतदारांनीच मतदानात भाग घेतला, असे आकडेवारीतून दिसून आले. आता रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात तरी महिलांकडून मंतदानंत आघाडी मिळेल, अशी आशा करू. (Role of female voters)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.