ध्वनी तरंगांचा शोध लावणारे इटालियन संशोधक Guglielmo Marconi

84

गुलियेल्मो मार्कोनी (Guglielmo Marconi) हे एक इटालियन संशोधक आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १८७४ साली इटली येथील बोलोन्या नावाच्या शहरात झाला. मार्कोनी यांनी वायरलेस पद्धतीने दूरवर जाणाऱ्या ध्वनी तरंगांचा शोध लावला होता. या ध्वनी तरंगांचा वापर रेडिओ टेलिग्राफ सिस्टीमसाठी केला गेला. मार्कोनी यांना रेडिओचे इन्व्हर्टर म्हणूनही ओळखलं जातं. १९०९ साली मार्कोनी यांना कार्ल ब्राऊन यांच्यासह भौतिकशास्त्र या विषयासाठी नोबेल पुरस्कारही देण्यात आला होता.

मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून पहिला प्रयोग केला 

मार्कोनी (Guglielmo Marconi) यांना अगदी लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबद्दल खूप कुतूहल होतं. त्यांनी हाइनरिक हर्ट्‌‌‌झ यांचे लेखही वाचलेले होते. १८९५ साली मार्कोनी हे हर्ट्‌‌झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्या येथील मोठ्या वाड्यात काम करायला लागले. त्यांना आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांबपर्यंत पाठवण्यात यश आलं. २ जून १८९४ रोजी इंग्लंड येथील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून गुलियेल्मो मार्कोनी यांचा पहिला प्रयोग करण्यात आला. त्यावेळी तिथे मोठमोठे सरकारी अधिकारी आणि पोस्टातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा Israel-Hamas Conflict: अमेरिकेत विद्यार्थ्यांनी निदर्शनं केल्यामुळे बायडन सरकार चिंतेत, विद्यापीठांमध्ये सामूहिक अटक सत्र सुरू)

पहिल्या विश्वयुद्धाच्या वेळी यंत्रणेचा वापर झाला 

तसेच सॅल्सबरी येथे मार्कोनी यांचा दुसरा प्रयोग केला तेव्हा त्या प्रयोगासाठी वायुदल आणि सेनादलातील कित्येक अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या प्रयोगाच्या वेळी बिनतारी संदेश दोन मैलांवरून ते दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू गुलियेल्मो मार्कोनी (Guglielmo Marconi) यांच्या बिनतारी संदेश यंत्रणेचे जाळे सगळीकडे पसरत गेले. १९१४ साली पहिल्या विश्वयुद्धाच्या वेळी मार्कोनी यांच्या बिनतारी संदेश यंत्रणेचा फार मोठा उपयोग इटालियन नौदल आणि वायुदल यांना झाला. जगातलं सर्वांत मोठं वायरलेस संदेश स्टेशन मार्कोनी यांनी उभारलं होतं. त्यासाठी त्यांना भौतिक शास्त्राचं नोबेल पारितोषिकही देण्यात आलं होतं.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.