lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये यादवांत महाभारत

भाजपाच्या ताब्यात गेलेला कन्नौजचा किल्ला परत मिळविण्याचा विडा अखिलेश यादव यांनी उचलला आहे. तेजप्रताप यादव यांची उमेदवार परत घेत अखिलेश यादव येथून लढणार असल्यााचे स्पष्ट झाल्यापासून कन्नौजमधील राजकीय वातावरण तापले आहे.

101
lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये यादवांत महाभारत

उत्तर प्रदेशच्या राजकीय अखाड्याचे पैलवान स्व. मुलायमसिंग यादव यांचे बंधू शिवपाल यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यांना जाहीर झालेली उमेदवारी परत घेत अखिलेश यादव यांनी ताल ठोकल्यामुळे कन्नौजची लढाई रंगतदार झाली आहे. भाजपाने सुब्रत पाठक यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. परंतु, पाठक यांच्या पत्नी नेहा पाठक यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरून तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडण्याचे काम केले आहे. (lok Sabha Election 2024)

यादव कुटुंबातच महाभारत

समाजवादी पक्षाने राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे जावई तेजप्रताप यादव यांना दिलेली उमेदवारी परत घेतली आहे. समा सुप्रिमो अखिलेश यादव स्वत: कन्नौजमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे, यादव कुटुंबातच महाभारत रंगले आहे. (lok Sabha Election 2024)

काका-पुतण्यात छत्तीसचा आकडा

सपा नेते मुलायमसिंग यादव यांचे बंधू शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यात छत्तीसचा आकडा सर्वविदित आहे. तेजप्रताप यादव हे शिवपाल यादव यांचे चिरंजीव. यांनाच कन्नौजमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ती मागे घेऊन अखिलेश यादव यांनी स्वत: लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यादव कुटुंबातच महाभारत सुरू झाले आहे. (lok Sabha Election 2024)

मुलायमसिंग यादव यांची कर्मभूमी

उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा मतदारसंघ म्हणजे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे जन्मस्थान. याच कन्नौलला समाजवादी नेते आणि राजकारणाच्या अखाड्यातील कुस्तीपटू मुलायम सिंह यादव यांनी आपली कर्मभूमी मानली. याच मतदारसंघातून ते सात वेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यांना कुणीही पराभूत करू शकले नाही. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे सुब्रत पाठक यांच्या हातून सपाच्या उमेदवार डिंपल यादव यांचा पराभव झाला. (lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Balbharti Syllabus: इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके पुढच्या वर्षी बदलणार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक)

२०१९ मध्ये सपाचा गड ढासळला

अगदी तळापर्यंत रूजलेली सपाची पाळेमुळे २०१४ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या झंझावातातच कमजोर पडली होती. मात्र, २०१९ मध्ये सपाचा गड पार भुईसपाट झाला. हा पराभव अखिलेश यादव यांच्या जिव्हारी लागला होता. कदाचित म्हणूनच, अखिलेश यादव आणि सुब्रत पाठक यांच्यातील खडाजंगी सारखी ऐकू येत होती. (lok Sabha Election 2024)

कन्नौजमधून सपा सातवेळा विजयी झाली

१९९८ पासून ते २०१४ पर्यंत लोकसभेच्या सात निवडणुका झाल्यात आणि या सातही वेळा सपा सुप्रिमो मुलायमसिंग यादव कन्नौजमधून विजयी झाले. मुलायमसिंह यादव यांनी २००० मध्ये चिरंजीव अखिलेश यादव यांच्या हाती सपाची सूत्रे सोपविली. २०१२ मध्ये अखिलेश राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर पोटनिवडणुकीत अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव यांना बिनविरोध निवडून आणले. थोडक्यात, यादव कुटुंबाने उमेदवार बदलला असला तरी विजयाची माळ सपाच्याच गळ्यात पडत आली. (lok Sabha Election 2024)

आता अखिलेश यादव रिंगणात

आता भाजपाच्या ताब्यात गेलेला कन्नौजचा किल्ला परत मिळविण्याचा विडा अखिलेश यादव यांनी उचलला आहे. तेजप्रताप यादव यांची उमेदवार परत घेत अखिलेश यादव येथून लढणार असल्यााचे स्पष्ट झाल्यापासून कन्नौजमधील राजकीय वातावरण तापले आहे. (lok Sabha Election 2024)

कन्नौजमधून अखिलेश यादव यांनीच लढावे असा आग्रह कार्यकत्र्यांनी रेटून लावला होता. सपा कार्यकर्ते लखनौपर्यंत गेले. काहींनी सैफईचे दार ठोठावले. शेवटी ज्येष्ठ नेते राम गोविंद चौधरी यांनी अखिलेश निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. (lok Sabha Election 2024)

…कनौजमध्ये क्रांती होणार

कन्नौजमधून लढण्याची घोषणा केल्यानंतर अखिलेश यादव यांनी फेसबुकवर ‘…कनौज क्रांती आता होईल’, अशी फेसबुकवर पोस्ट केली आहे. (lok Sabha Election 2024)

‘कन्नौज सुगंधाचे शहर होय. हे शहर सकारात्मक राजकारणाला नकारात्मक राजकारण करणाऱ्या भाजपाला पराभवाकडे नेत आहे. हा बदल इतिहासात ‘कनौज-क्रांती’ म्हणून ओळखला जाईल’, असेही त्यांनी लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘सुगंध की नगरी सकारात्मक राजनीति के जवाब के रूप में, नकारात्मक राजनीति करने वाली भाजपा को जिस तरह की पराजय की ओर ले जा रही है, इतिहास में उसे ‘कन्नौज-क्रांति’ के नाम से जाना जाएगा। जनतंत्र में जनता की मांग ही सर्वोपरि होती है। कन्नौज के हर गांव-गली-गलियारे से जो आवाज उठ रही है, साथ ही जो सपा और आइएनडीआइए गठबंधन के स्थानीय नेताओं-कार्यकर्ताओं की भी पुरजोर मांग है, वह सर आंखों पर।… ‘कन्नौज-क्रांति’ होकर रहेगी। मोहब्बत की महक फैलानी है? हमको लिखनी नई कहानी है!!।’ (lok Sabha Election 2024)

कन्नौजचा इतिहास जगाला दिसेल – सुब्रत पाठक

सुब्रत पाठक हे कन्नौजचे विद्यमान भाजपा खासदार होय. ते यावेळीही रिंगणात असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. सपाच्या भूमिकेवर हल्ला चढवित ते म्हणाले की, ‘अखिलेश यादव हा राज्यातील सर्वात मोठा जातीयवादी चेहरा आहे. ते माफियांच्या शोकसभेतला जातात. कन्नौजच्या लोकांनी नेहमीच इतिहास लिहिला आहे. यावेळीही अखिलेश यांचा पराभव करण्याचा सर्वांनीच निर्धार केला आहे. त्यानंतर घडलेला इतिहास जगाला दिसेल. (lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Sugar Mills: राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारांना दिलासा, निवडणुकीपूर्वी कर्जाची हमी कोणाला मिळणार? वाचा)

नेहा पाठक यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला

सपा आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत रंगली असतानाच भाजपा खासदार सुब्रत पाठक यांच्या पत्नी नेहा पाठक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामुळे, कन्नौजच्या राजकारणात नवीन ट्वीस्ट निर्माण झाला असून राजकीय वातावरण तापले आहे. याशिवाय राष्ट्रीय शोषित समाज पक्षाकडून माजी खासदार रामबक्ष सिंह यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचा मुलगा आलोक वर्मा यांनीही याच पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे. बसपाचे उमेदवार इम्रान यांनी उमेदवारी दाखल केली आहे. (lok Sabha Election 2024)

सपा आणि भाजपा या दोघांची प्रतिष्ठा पणाला 

कन्नौज जागेवर सपा आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सपामध्ये या जागेची जबाबदारी स्वत: अखिलेश यादव यांच्यावर आहे. तसेच खासदार सुब्रत पाठक यांना विजयी बनविण्याची जबाबदारी समाजकल्याण मंत्री तथा सदरचे आमदार असीम अरुण, जिल्हा पंचायत अध्यक्षा प्रिया शाक्य, छिब्रामाळच्या आमदार अर्चना पांडे, तिरवाचे आमदार कैलास राजपूत आणि रसुलाबादच्या आमदार पूनम संखवार यांच्या खांद्यावर आहे. (lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.