२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2026) पहिल्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदान सुरू आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ४१.११% मतदान झाले. राज्यभरात उत्साह दिसून आला, अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (West Bengal Assembly Elections 2026)
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक ४४.६९% मतदान पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात झाले, त्याखालोखाल झाडग्राममध्ये ४३.७१%, बांकुरामध्ये ४३.२२% आणि पूर्व मेदिनीपूरमध्ये ४२.१६% मतदान झाले. याव्यतिरिक्त, बीरभूममध्ये ४१.९२ टक्के, मुर्शिदाबादमध्ये ४१.५९ टक्के, दक्षिण दिनाजपूरमध्ये ४१.१७ टक्के आणि पश्चिम बर्धमानमध्ये ४०.२४ टक्के मतदानाची नोंद झाली. (West Bengal Assembly Elections 2026)
सर्वात कमी ३८.२२ टक्के मतदान मालदा जिल्ह्यात झाले, त्याखालोखाल कूचबिहारमध्ये ३८.६७ टक्के, अलीपूरद्वारमध्ये ३८.८ टक्के आणि उत्तर दिनाजपूरमध्ये ३९.०४ टक्के मतदान झाले. उत्तर बंगालच्या इतर जिल्ह्यांमध्ये, दार्जिलिंगमध्ये ३९.७२ टक्के, कालिम्पोंगमध्ये ३९.६१ टक्के आणि जलपाईगुडीमध्ये ३९.५१ टक्के मतदानाची नोंद झाली. पुरुलियामध्ये ३९.१६ टक्के मतदान झाले. (West Bengal Assembly Elections 2026)
सकाळपासूनच राज्यातील अनेक भागांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदारांचा चांगला सहभाग दिसून आला. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू आहे. दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी मतदानाची टक्केवारी आणखी वाढेल, अशी आशा निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. (West Bengal Assembly Elections 2026)
Join Our WhatsApp Community

