-
ऋजुता लुकतुके
अमेरिका-इराण तणावाच्या(Iran Tensions)पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “लवकरच चांगली बातमी मिळू शकते” असा संकेत देत अमेरिका-इराण चर्चेची शक्यता व्यक्त केली आहे.(Iran Tensions)
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लागू असलेला युद्धविराम वाढवण्यात आला असून त्यामुळे दोन्ही देशांना चर्चेसाठी अधिक वेळ मिळाला आहे. पाकिस्तान या प्रक्रियेत मध्यस्थाची भूमिका बजावत असून, पुढील चर्चेचा फेरा शुक्रवारी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.(Iran Tensions)
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, योग्य ते घडतंय. आणि दिशाही बरोबर आहे. “चांगली बातमी” लवकर मिळू शकते. मात्र त्याचवेळी अमेरिकेने लष्करी सज्जता कायम ठेवली आहे आणि इराणवर दबावही सुरू आहे.(Iran Tensions)
(हेही वाचा – Baramati Rahuri By-Election 2026 : बारामती-राहुरीत सहानुभूती की परिवर्तन? )
दरम्यान, हा युद्धविराम पाकिस्तानच्या हस्तक्षेपामुळेच वाढवण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करी नेतृत्व दोन्ही देशांमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.(Iran Tensions)
तथापि, अजूनही परिस्थिती पूर्णपणे स्थिर नाही. इराणकडून अद्याप स्पष्ट आणि एकमताचा प्रस्ताव आलेला नाही.इराणमधील अंतर्गत मतभेदांमुळे चर्चेला विलंब होत असल्याचेही सांगितले जात आहे.(Iran Tensions)
याशिवाय, अमेरिकेने इराणवर समुद्री नाकेबंदी कायम ठेवली आहे, ज्यामुळे तणाव पूर्णपणे कमी झालेला नाही. इराणने या नाकेबंदीला “युद्धासारखी कृती” असे म्हटले आहे. युद्धविराम वाढवून चर्चेला संधी देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अजूनही अनिश्चितता कायम आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या संभाव्य चर्चांवरच या संघर्षाचे भविष्य अवलंबून राहणार आहे.(Iran Tensions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

