विसर्जनापूर्वी Mumbai High Court चा मोठा दणका; ढोल-ताशांसोबत फटाके अन् ‘टोल’वर थेट बंदी

15
Mumbai High Court

सार्वजनिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान निर्माण होणाऱ्या तीव्र आवाजाबाबत न्यायालयाने, मंगळवारी, २२ सप्टेंबरला अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही एका धर्मापुरता हा विषय मर्यादित नसून, हिंदू, मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही समुदायाचे सण असोत, सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विशेषतः मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाजवले जाणारे धातूचे सिलेंडर म्हणजेच टोल वाद्य, रस्त्यांवर फोडले जाणारे फटाके आणि डोळ्यांना अपायकारक ठरणारे लेझर लाईटवर सरसकट बंदी लागू करण्यात आली आहे.  (Mumbai High Court)

(हेही वाचा – Boxing News : ठाणे ग्रामीण जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाडचे निर्विवाद वर्चस्व)

नियम असूनही उल्लंघन का?

न्यायमूर्ती नीला गोखले यांनी विचारणा केली, तुम्ही कागदावर एवढे सगळे नियम सांगता, तरीही त्यांचे सर्रास उल्लंघन का होते? ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा आकडा कुठे आहे? त्यावर महाधिवक्ता साठे यांनी कारवाईची आकडेवारी सरकारकडे असल्याचे सांगितले. मिरवणुकीतील कर्णकर्कश आवाजावर बोट ठेवताना न्यायमूर्ती कुलकर्णी म्हणाले, मिरवणुकीत मोठे सिलेंडर आणून त्यावर हातोड्याने बडवले जाते, हे काय आहे? हे कोणतेही वाद्य नाही. (Mumbai High Court)

न्यायमूर्तींनी दिले वारीचे उदाहरण

न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी वारकरी परंपरेचा दाखला देत सांगितले, पंढरपूरच्या वारीचे उदाहरण घ्या; त्यात हजारो लोक सहभागी होतात, मात्र त्यांच्याकडे फक्त एक टाळ असतो आणि ते कधीही कोणाला त्रास देत नाहीत. त्यामुळे जो कोणी सार्वजनिक ठिकाणी मोठा आवाज करून त्रास देईल, त्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. गणपती मंडप शाळा किंवा रुग्णालयांप्रमाणे शांतता क्षेत्रात येतात का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर साठे यांनी स्पष्ट केले की, मंडपही शांतता क्षेत्रात मोडू शकतात, मात्र त्यासाठी त्यांना रीतसर सूचीबद्ध करावे लागेल.

काय आहेत उच्च न्यायालयाचे आदेश?

  • ‘टोल’ वाद्यावर बंदी: ढोल-ताशा पथकांमध्ये हातोड्याने बडवल्या जाणाऱ्या सिलेंडरवर/लोखंडी टोलवर पूर्णपणे बंदी.
  • फटाके व लेझर लाईटवर निर्बंध: धार्मिक उत्सव व मिरवणुकांदरम्यान सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी.
  • परवानगी प्रदर्शित करणे बंधनकारक: सर्व गणेश मंडळांना महापालिका आणि पोलिसांकडून मिळालेली परवानगी मंडपावर ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल. परवानगी प्रदर्शित न केल्यास ध्वनिक्षेपक (स्पीकर) वापरता येणार नाहीत.
  •  जप्तीची कारवाई: ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांची ध्वनी उपकरणे जप्त करण्याचे आदेश.
    हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.