Donald Trump यांचा यू-टर्न! इराणवरील लष्करी कारवाई तूर्तास लांबणीवर; नेमकं कारण काय?

Donald Trump यांचा यू-टर्न! इराणवरील लष्करी कारवाई तूर्तास लांबणीवर; नेमकं कारण काय?

69
Donald Trump Pauses Iran Strike
Donald Trump Pauses Iran Strike

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील प्रस्तावित लष्करी कारवाई तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इराण आणि पश्चिम आशियातील काही देशांच्या विनंतीवरून चर्चेला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.(Donald Trump Pauses Iran Strike)

(हेही वाचा: Beed News : MPSC चा टॉपर ते मोठा लाचखोर! तब्बल ४५ लाखांची लाच घेताना ACBच्या सापळ्यात; नेमकं प्रकरण काय?)

अमेरिका इराणविरोधातील लष्करी कारवाईसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले जात असतानाच इराणसोबत एका संभाव्य कराराची प्राथमिक रूपरेषा ठरल्यामुळे ही कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. माहितीनुसार, प्रस्तावित करारामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी तात्काळ खुली करण्यासह इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंध घालण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांबाबत इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.(Donald Trump Pauses Iran Strike)

(हेही वाचा: Ceuta Migration Crisis : युरोपमध्ये खळबळ! ६० हजार स्थलांतरितांच्या घुसखोरीनंतर EU ची ५ ऑगस्टला आणीबाणीची बैठक)

अमेरिका इराणविरुद्ध अत्यंत तीव्र आणि शक्तिशाली कारवाईसाठी सज्ज होती. इराण आणि पश्चिम आशियातील काही देशांच्या विनंतीवरून जागतिक शांततेसाठी आणि इराणच्या अस्तित्वासाठी हल्ला रद्द करण्यात आला. या शांतता प्रक्रियेत आणि कराराच्या बांधिलकीत इस्रायल देशही अमेरिकेसोबत आहे. हा करार जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश ट्रम्प यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.(Donald Trump Pauses Iran Strike)

(हेही वाचा: Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातविरोधात ईडीने फास आवळला! कोर्टात सादर केले नवे पुरावे)

दुसरीकडे, अमेरिकेकडून किंवा तिच्या सहयोगी देशांकडून हल्ला झाल्यास इस्रायलमधील महत्त्वाची ठिकाणे तसेच अमेरिकेचे ऊर्जा प्रकल्प लक्ष्य केले जातील, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव कायम असून पुढील घडामोडींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.(Donald Trump Pauses Iran Strike)

हेही पाहा:

 

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.