या एका गोष्टीनेच…; सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान DCM Eknath Shinde यांचा मोठा दावा

93
DCM Eknath Shinde
DCM Eknath Shinde
  • प्रतिनिधी

DCM Eknath Shinde         शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार करत जनादेशालाच सर्वात मोठा निकाल असल्याचा दावा केला. शिवसेना कोणाची, याचे उत्तर न्यायालयापूर्वीच महाराष्ट्रातील जनतेने मतदानातून दिले असून त्यानंतर विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच उरलेले नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (DCM Eknath Shinde)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ४० आमदारांसह घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाल्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न आधीच निकाली निघाल्याचा दावा त्यांनी केला. (DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नेतृत्वात मोठा बदला! Nirmala Navle यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा)

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा उल्लेख करताना त्यांनी न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. न्यायालय योग्य निर्णय देईल, अशी अपेक्षा व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्याची भूमिका त्यांनी मांडली. (DCM Eknath Shinde)

यावेळी विरोधकांच्या ‘घटनाबाह्य सरकार’ या आरोपांवरही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निर्णयाचा संदर्भ देत सरकार संविधान आणि कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसारच स्थापन झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले. तरीही विरोधक वारंवार तोच आरोप करत असून तीच “जुनी कॅसेट” पुन्हा लावण्याचे काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली. (DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – Jharkhand सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या ११ सदस्यीय शिष्टमंडळाची घोषणा)

विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, निकाल आपल्या बाजूने लागला तर न्यायालयाचे कौतुक केले जाते, मात्र निकाल विरोधात गेल्यावर न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. ही भूमिका लोकशाहीसाठी योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. (DCM Eknath Shinde)

शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरील आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला. “आमचा विश्वास जनतेवर, संविधानावर आणि न्यायदेवतेवर आहे. शिवसेना कोणाची, याचा निर्णय केवळ न्यायालयातच नाही, तर महाराष्ट्रातील जनतेने मतदानातून आधीच दिला आहे. आम्ही ४० आमदारांसह बाहेर पडलो आणि जनतेने आम्हाला अधिक मोठा जनादेश देत आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जनमत आणि न्यायप्रक्रिया या दोन्हीवर आमचा पूर्ण विश्वास आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (DCM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.