अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील अर्थव्यवस्थेचे केंद्र बनेल; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास

प्राइम फोकसच्या अत्याधुनिक स्टुडिओचे उद्घाटन

75
CM Devendra Fadnavis speaking at the inauguration event.
अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील अर्थव्यवस्थेचे केंद्र बनेल; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास
  • प्रतिनिधी

CM Devendra Fadnavis              देशाला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरातील प्राइम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून मुंबई सर्जनशील उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. (CM Devendra Fadnavis)

फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभारून जगभरातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांना सेवा देण्याचा प्राइम फोकसचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला आहे. सरकारने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य केले. ‘वेव्ह्स २०२५’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, ही उल्लेखनीय बाब आहे. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Jharkhand सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या ११ सदस्यीय शिष्टमंडळाची घोषणा)

जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची निर्मिती या स्टुडिओमध्ये होत असल्याचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. भारतीय सर्जनशीलतेचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना म्हणून हा चित्रपट ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (CM Devendra Fadnavis)

युवा पिढीच्या सर्जनशील क्षमतेला वाव देणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि मनोरंजन उद्योगासाठी सक्षम परिसंस्था उभारणे यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. फिल्मसिटीचे जागतिक दर्जाच्या सर्जनशील आणि मनोरंजन केंद्रामध्ये रूपांतर करण्याचा व्यापक पुनर्विकास आराखडाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Dahi Handi 2026 : १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण; क्रीडा विभागाचा शासन निर्णय जारी)

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रपट नगरीच्या (फिल्मसिटी) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील तसेच प्राइम फोकस समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.