
-
प्रतिनिधी
Chandrashekhar Bawankule सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हा रोजगार हजारो कुटुंबांचा आधार असून व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला बळीचा बकरा बनवले जाईल अशी कोणतीही विधाने अधिकाऱ्यांनी करू नयेत, अशी तंबी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिली. (Chandrashekhar Bawankule)
तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना, मी जर सावजी मटण खाल्ले तर महिनाभर आजारी पडेन आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे सावजी रेस्टॉरंट चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री बावनकुळे यांनी मुंढे यांचे नाव न घेता त्यांना समज दिली. (Chandrashekhar Bawankule)
(हेही वाचा – Maharashtra SIR Deadline Extended : १७ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरा; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन)
विदर्भामध्ये गेली तीन-चार पिढ्यांपासून सावजी रेस्टॉरंट्स अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहेत. सावजी ही मसाला आणि अन्नपदार्थ बनवण्याची एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पद्धती आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सावजीच्या जेवणाचा आस्वाद घ्यावासा वाटतो, इतकी या अन्नाची लोकप्रियता आहे. हे खास मसाले इतर कोणीही बनवू शकत नाही. आज जगातल्या अनेक देशांमध्ये सावजीच्या पदार्थांना मोठी मागणी असताना एका अधिकाऱ्याने संपूर्ण उद्योगावर अशी सरसकट आणि नकारात्मक टिप्पणी करणे पूर्णपणे अयोग्य आहे, असे मंत्री बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
अन्नात कुठे भेसळ किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारी गोष्ट आढळल्यास त्या विशिष्ट ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यास कोणाचीही अडचण नाही. परंतु, संपूर्ण सावजी व्यवसायाला लक्ष्य करणे चुकीचे आहे. त्यामुळे या व्यवसायाला फटका बसेल किंवा रेस्टॉरंट्स बंद पडतील अशा स्वरूपाची वक्तव्ये अधिकाऱ्यांनी टाळावीत, असा सल्ला मंत्री बावनकुळे यांनी दिला. (Chandrashekhar Bawankule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
