-
कल्याण, प्रतिनिधी
Crime कल्याण रेल्वे स्थानकात झारखंडला चाललेल्या एका प्रवाशाच्या हातात प्लॅटफाॅर्म तिकीट टेकवून मी तुझे हावडा बंगाल येथील तिकीट काढले आहे. या तिकीट भाड्याचे ५१० रूपये झाले, असे सांगून प्रवाशाची लूट करून पसार झालेल्या भामट्याला लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातूनच बुधवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला भामटा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. (Crime)
अतुल मोहन अडलिंगे (३२, रा. कासेगाव, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या विरोधात तक्रार देणारा दिल मोहम्मद शेख (१८) हा झारखंड राज्याच्या पुकर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तक्रारदार सारीकुल शेख हा सध्या ठाण्यातील हाजुरी दर्ग्यात मजुरीचे काम करतो. सारीकुलचे वडील खाणकामगार आहेत. या संदर्भात सारीकुल याने दिलेल्या तक्रारीनुसार, झारखंडला मुळ गावी जाण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात आलो. तिकीट काढण्यासाठी जाताना एका अनोळखीने किती वाजले? तु कोठे जात आहेस? अशी विचारणा केली. आपण पश्चिम बंगालला हावडा येथे जात असल्याचे सांगताच, त्याने मी कोलकत्ता येथे चाललो आहे असे सांगितले. त्या अनोळखी इसमाने तिकीट काऊंटरवरून आपले ५०० रूपयांचे तिकीट मी न सांगताच काढून आणल्याचे सांगितले. तो इसम आपल्याकडे तिकिटाचे ५१० रूपये मागू लागला. मी त्याला स्थानकाबाहेरील दुकानदारामार्फत ऑनलाईद्वारे ५१० रूपये दिले. (Crime)
(हेही वाचा – राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नेतृत्वात मोठा बदला! Nirmala Navle यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा)
हावड्याचे रेल्वे तिकीट देण्याचे आमिष दाखवत भामट्याने सारीकुल शेख याला १० रूपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट दिले. त्यानंतर त्या तिकिटावर मार्कर पेनने ५ हा अंक लिहून ते ५१० रूपयांचे तिकीट असल्याचा भास निर्माण केला आणि त्या बदल्यात ५१० रूपये उकळले. सदर तिकिट प्लॅटफाॅर्मचे असल्याचे, शिवाय त्यावर पेनाने खाडाखोड केल्याचे दिसताच फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्या इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यत भामटा तेथून पसार झाला होता. स्थानकावर भेटलेल्या लोहमार्ग पोलिसांना सारीकुल याने घडलेला सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात त्या इसमाचा शोध घेतला. त्यावेळी तो इसम स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर दबा धरून बसल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याने आपण सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याने केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली. (Crime)
सारीकुल शेख याने लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी अतुल अडलिंगे याला ताब्यात घेऊन अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

