राजीनाम्याच्या वल्गना केवळ नौटंकी; उद्धव ठाकरे ‘यू-टर्न’ घेणारच, BJP चा टोला

86
'पळपुटे विरोधक' ते 'भ्रष्ट इंडिया कंपनी'; BJP चा राहुल गांधी आणि संजय राऊतांवर घणाघात
  • प्रतिनिधी

​BJP             उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देण्याची केलेली घोषणा म्हणजे पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करणारा ‘यू-टर्न’ ठरेल, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. शनिवारी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना उबाठावर जोरदार शाब्दिक प्रहार केले. (BJP)

​उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर संशय व्यक्त करताना नवनाथ बन म्हणाले की, “यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची अशीच गर्जना केली होती, परंतु त्यांनी सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. काँग्रेससोबत कधीही जाणार नाही अशी शपथ घेऊन नंतर त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणाऱ्या ठाकरे यांना ‘यू-टर्न’ घेण्याची जुनी सवय आहे. त्यामुळे यावेळीही ते राजीनामा देणार नाहीत, हे निश्चित आहे.” (BJP)

(हेही वाचा – Rain Update: मोसमी पावसाच्या संथ वाटचालीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम, पर्यटक ६० टक्क्यांनी कमी; आणि…)

​यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. “संजय राऊत हे शिवसेना उबाठाचे केवळ ‘भोंगे’ आहेत. आदित्य ठाकरे यांनी कालच्या सभेत त्यांना भाषण करू न देऊन ही बाब स्पष्ट केली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच पक्षाची वाताहत होत असून, लवकरच आदित्य ठाकरे त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवतील. हे भोंगे आता म्यूट होण्याची वेळ आली आहे,” असा दावा त्यांनी केला. (BJP)

​भाजपाच्या प्रवक्त्यांनी शिवसेना उबाठाचा डीएनए ‘पाकिस्तानधार्जिणा’ असल्याचे गंभीर आरोप करत, त्यांना हिंदूत्त्वाच्या विचारांपासून दूर गेल्याचे सुनावले. “धनुष्यबाण आणि मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेनेचा डीएनए हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे, मात्र आता शिवसेना उबाठाने औरंगजेब आणि अफजलखान फॅन क्लबचे धोरण स्वीकारले आहे,” असेही ते म्हणाले. (BJP)

(हेही वाचा – Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना, छत्रपती संभाजीनगरचे ५ पर्यटक समुद्रात बुडाले; शोध मोहीम सुरू)

​शेवटी, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नटरंग’ आणि ‘नाचा’ची भूमिका बजावत असून, त्यांनी पक्षाचा तमाशा करून ठेवला आहे,” अशा कडक शब्दांत नवनाथ बन यांनी शिवसेना उबाठाच्या कार्यपद्धतीवर शरसंधान केले. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.