
Rain Update: मोसमी पावसाची वाटचाल संथ गतीने सुरू असून राज्यातील उर्वरीत भागांत मोसमी पाऊस सक्रिय होईपर्यंत आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्याचाच परिणाम आता जून महिन्यातील हंगामी पर्यटनावर होत आहे. याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे.
जूनच्या पंधरवड्यात होणाऱ्या पावसाळी सहली कमी झाल्यने मुंबईजवळील अनेक पर्यटनस्थळांवर रखरखीत उन्हासह शुकशुकाट असून व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा – Monsoon लांबला! पेरणीबाबत शेतकऱ्यांना जय पवारांचा महत्त्वाचा सल्ला
साधारणपणे पूर्व मोसमी पावसाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस मुंबईसह उत्तर कोकणात सक्रीय होतो. पावसाचा जोर वाढला की हौशी पर्यटकांची पावले मुंबईजवळील डोंगराळ भागातील पाऊसवाटांकडे वळतात, मात्र यंदा जूनच्या पंधरवडा संपला तरीही मोसही तरीही मोसमी पाऊस मुंबईसह उत्तर कोकणात दाखल झालेला नाही.
पूर्वमोसमी पावसासाठीही अनुकूल स्थिती नसल्याने यंदा पर्यटकांनी जूनमधील सहलीचे बेत रखडले असून काहींनी पाऊस लांबल्याने आपले पूर्वनियोजित बेत रद्द केले आहेत. याचा फटका आता पर्यटन व्यवसायावर होताना दिसत असून पुढील काही दिवसांत पाऊस सक्रिय झाला नाही, तर व्यावसायिकांना जून महिन्यात मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
आगाऊ बुकिंग रद्द
मुंबईपासून जवळ असणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील डोंगराळ भागात तसेच समुद्रकिनारी अनेक पर्यटन व्यावसायिक असून या परिसरात कृषी पर्यटन केंद्राची संख्याही मोठी आहे. पावसाळी हंगाम या सर्व व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा असतो, मात्र सध्या व्यावसायिकांना पावसासह पर्यटकांचीही वाट पाहावी लागत आहे. जून महिन्यात झालेले आगाऊ बुकिंगही पर्यटक रद्द करत आहेत. पाऊस आणखीन लांबला तर आम्हाला आणखी नुकसान सहन करावे लागू शकते, असे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
पर्यटक ६० टक्क्यांनी कमी
यंदा पर्यटकांची संख्या ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. वसईतील शिरसाड येथे असणाऱ्या रोहिणी कृषी पर्यटन केंद्रातही जूनच्या पंधरवड्यात पर्यटकांची संख्या कमी होती. पाऊस असला की, पर्यटकांची संख्या जास्त असते, असे रोहिणी कृषी पर्यटन केंद्राचे रोहित गुप्ते सांगतात. यंदा सरासरीहून कमी पावसाचा अंदाज असून पावसांचे प्रमाण कमी राहिल्यास मोसमी पावसाच्या संपूर्ण हंगामातच पर्यटन व्यवसायाला फटका बसण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
