Swatantra Veer Savarkar Movie : उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या दबावाला बळी पडू लागले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षातील बहुतेकांनी अद्याप ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Movie ) चित्रपट पाहिलादेखील नाही. कुठे गेला तो ठाकरी बाणा? की ठाकरेही आता कॉँग्रेसच्या दबावाला बळी पडू लागले?, असा सवाल सामान्य मराठी माणूस विचारू लागला आहे.

151
Swatantra Veer Savarkar Movie : उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या दबावाला बळी पडू लागले?
Swatantra Veer Savarkar Movie : उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या दबावाला बळी पडू लागले?

साधारण वर्षभरापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेऊन ‘लोकशाहीची लढाई लढायची असेल, तर आमचे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही’ असा सज्जड दम देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षातील बहुतेकांनी अद्याप ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) चित्रपट पाहिलादेखील नाही. कुठे गेला तो ठाकरी बाणा? की ठाकरेही आता कॉँग्रेसच्या दबावाला बळी पडू लागले?, असा सवाल सामान्य मराठी माणूस विचारू लागला आहे.

(हेही वाचा – Ramdas Athawale: भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत; रामदास आठवलेंची राहुल गांधींवर घणाघाती टीका)

फक्त वर्ष झाले…

गेल्या वर्षी, २६ मार्च २०२३ ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मालेगावात एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘माफी मागायला मी सावरकर नाही’ असे वक्तव्य नुकतेच केले होते. यावरून खवळलेल्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जाहीर सभेत नाव घेऊन ठणकावले. “स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत असून आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही,” अशी गर्जना त्यांनी केली होती. तसेच, “लोकशाहीसाठी आपण एकत्र आलो आहोत, त्याला वेगळे फाटे फोडू नका. १४ वर्षे अंदमानच्या तुरुंगात मरणयातना सोसणे, हे येरागबाळ्याचे काम नाही,” याची आठवण करून देत, “लोकशाहीची लढाई लढायची असेल, तर आमच्या दैवताचा अपमान सहन करणार नाही,” असा सज्जड दम ठाकरे यांनी दिला होता.

प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ

ठाकरे यांचे सावरकरप्रेम जगजाहीर आहे मात्र गेल्या वर्षभरात चित्र बदलल्याचा अनुभव येत आहे. जो चित्रपट देशभरात जाज्वल राष्ट्रप्रेमाचा संदेश देत आहे आणि मराठी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला असा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांनी अद्याप पाहिलाच नाही. तसेच त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असल्याचे जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे.

(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये वंचित आघाडीवरून नव्या वादाची ठिणगी?)

शांत राहायचे – आदित्य ठाकरेंची भूमिका

“सावरकर चित्रपट बघण्याची काय गरज आहे, अख्खे सावरकर उद्धव ठाकरे यांना तोंडपाठ आहेत,” असे मत उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले. तसेच त्यांचे चिरंजीव आणि शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनीही चित्रपट पाहिला नसल्याचे सांगण्यात आले. या विषयावर “शांत राहायचे आहे, काही प्रतिक्रिया द्यायची नाही,” असे आदित्य (Aaditya Thackeray) यांचे सांगणे असल्याचे त्यांच्या जवळच्या व्यक्तीने ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले.

नक्की पाहणार – संजय राऊत

शिवसेना उबाठा खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र आपण हा चित्रपट पाहिला नसल्याची कबुली देत, “नक्की पाहणार” असल्याचे सांगितले. तर माजी मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.