IPL 2024, Rohit Sharma : सलग चौथ्या खराब खेळीनंतर रोहित शर्मा डग आऊटमध्ये रडला का?

रोहित शर्माचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

176
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माची (Rohit Sharma) सुरुवात तर चांगली झाली. पण, त्यानंतर अलीकडच्या काही सामन्यांत त्याचा फॉर्म घसरला आहे. आणि विशेष म्हणजे एकसारखे फटके खेळून तो बाद होत आहे. आधीच मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत सातत्य नाही आहे. आणि त्यातच रोहित चुकीचा फटका खेळून बाद झाला तर संघाला चांगली सुरुवातही मिळत नाही, अशी संघाची अवस्था आहे. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबईने सामना गमावला. पण, रोहीत शर्माने (Rohit Sharma) शतक झळकावलं होतं. त्यानंतर मात्र चार सामन्यांत रोहितची कामगिरी एकेरी धावसंख्येची आहे. त्याच्या शेवटच्या पाच खेळी आहेत – ४, ११, ४, ८ व ६. म्हणजे पाच डावांमध्ये ३२ धावा.

२ जूनपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. आणि त्यापूर्वी रोहितचा फॉर्म हा भारतीय संघाची काळजी वाढवणारा ठरणार आहे. समालोचक हर्ष भोगले यांनीही हाच मुद्दा उचलला आहे. ‘रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म ही आता चिंतेची बाब बनली आहे. आधीच्या ७ सामन्यांत २९७ धावा आणि शेवटच्या ५ डावांत ३२. हे चित्र काळजी वाढवणारं आहे,’ असं भोगले यांनी ट्विट केलं आहे.

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांना दुहेरी झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, २० मेपर्यंत कोठडी)

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रोहीत बाद झाल्यानंतर तो स्वत: काहीसा निराश दिसला. हताश अवस्थेत ड्रेसिंग रुममध्ये बसलेला रोहित टीव्हीच्या पडद्यावर दिसत होता. सोशलमीडियावरही त्याचे असेच काही व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. काहींना तो रडत असल्याची शंकाही येत आहे.

यंदाच्या हंगामात रोहित शर्माकडून (Rohit Sharma) संघ प्रशासनाने कप्तानीही अचानक काढून घेतली. आणि गुजरात टायटन्सकडून संघात परतलेल्या हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आलं. त्यानंतर रोहित आणि हार्दिक असे संघात दोन तट तयार झाल्याच्या बातम्याही सुरुवातीला आल्या होत्या. चाहत्यांनी मैदानात आणि सोशल मीडियावरही रोहितला आपला पाठिंहा जाहीर केला.

संघातील ही अस्वस्थता मैदानावरही दिसली. आणि ११ सामन्यांत मुंबई इंडियन्सला ७ पराभव पचवावे लागले. संघाचं स्पर्धेतील आव्हानही जवळ जवळ संपल्यात जमा आहे. पण, त्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे. आणि त्या दृष्टीनेही रोहितचा फॉर्म ही संघासाठी महत्त्वाची गोष्ट असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.