देशात ‘व्होट जिहाद’ चालणार की ‘राम राज्य’? जनतेला सवाल विचारात PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते खरगोनमध्ये एका सभेला संबोधित करत आहेत. एका मताचे महत्त्व त्यांनी जनतेला समजावून सांगितले.

92
देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? जनतेला सवाल विचारात PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीतील तिसऱ्या फेरीमधील मतदानादरम्यान पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) मध्य प्रदेशातील खरगोन (Madhya Pradesh Khangoan) जनतेला संबोधित केले. तत्पूर्वी त्यांनी अहमदाबादमध्ये मतदान केले. यानंतर पंतप्रधान मोदी मध्य प्रदेश येथील खरगोनला रवाना झाले. मताचे महत्त्व जनतेला समजावून सांगत त्यांनी मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे भारतरत्न Pandurang Waman Kane यांच्याबद्दल जाणून घेऊया)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत देश इतिहासाच्या अत्यंत महत्वपूर्ण वळणावर उभा आहे. आपल्याला ठरवायचे आहे, भारतात ‘व्होट जिहाद’ चालणार की ‘राम राज्य चालणार’. पाकिस्तानात दहशतवादी भारताविरोधात जिहादची धमकी देत आहेत आणि येथील काँग्रेसच्या लोकांनीही पंतप्रधान मोदीं विरोधात व्होट जिहाद करा, अशी घोषणा केली. अर्थात पंतप्रधान मोदीं विरोधात एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी एकजूट होऊन व्होट करा, असे सांगितले जात आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) मंगळवारी काँग्रेसवर (Congress) हल्ला चढवला. ते मध्यप्रदेशातील खरगोन येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे मतदानाच्या दिवशी Ajit Pawar यांच्या घरी, नेमकं कारण काय ?)

तसेच भाजपा सरकारने मध्य प्रदेशला एक नवीन आणि अभिमानास्पद ओळख दिली आहे. मी विकसित भारताच्या संकल्पासाठी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. पंतप्रधान मोदी खरगोनमध्ये म्हणाले, “तुमच्या एका मताने कलम ३७० हटवले, राम मंदिर बांधले, (Ram Mnadir) पण हा फक्त ट्रेलर आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हा देश पुढे जात आहे. या रॅलीमध्ये तुमच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि तुमचे अभिनंदन करतो. तुमच्या मताने ५०० वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि प्रभू रामाचे भव्य मंदिर बांधले. हा फक्त ट्रेलर आहे. अजून बरेच काही करायचे आहे. इंडी आघाडीवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांना तुमच्या सुख-दु:खाची पर्वा नाही. तसेच तुम्ही एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. असे विधान मध्य प्रदेश येथील खरगोनमधील जनतेला संबोधित करताना म्हणाले. माझी सर्व मतदारांना नम्र विनंती आहे की, तुम्ही मोठ्या संख्येने आणि उत्साहाने मतदान करा. असे जनतेला आवाहन केले. (PM Narendra Modi) 

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.