Lok Sabha Seats In India : भारतात लोकसभेच्या किती जागा आहेत?

174
लोकसभा ही भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. त्यातील सदस्य खासदार असतात. प्रत्येक खासदार एकाच भौगोलिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. सध्या 543 मतदारसंघ आहेत (Lok Sabha Seats In India), तर कमाल जागा 550 पर्यंत भरतील (कलम 331 नंतर, 2 जागा अँग्लो इंडियनसाठी राखीव होत्या परंतु 104 व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 331 ही दुरुस्ती करण्यापूर्वी संसदेने 552 जागांची कमाल संख्या रद्द केली होती) भारतीय राज्यघटनेत नमूद केल्यानुसार लोकसभेचा कमाल आकार 552 सदस्य आहे, ज्यामध्ये 28 राज्यांतील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे 524 सदस्य आणि त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर 8 केंद्रशासित प्रदेशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे 19 सदस्य आहेत .

प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो

लोकसभा हे भारतीय (Lok Sabha Seats In India) संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार लोकसभेची तरतूद केली आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, ‘भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत. ‘लोकसभा’ हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.