Devendra Fadanvis : काँग्रेस नेता पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये करत असताना उद्धव ठाकरे गप्प का; फडणवीसांचा हल्लाबोल

116
Devendra Fadnavis: परकीय गुंतवणुकीत यंदा महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Devendra Fadnavis: परकीय गुंतवणुकीत यंदा महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलत असूनही काँग्रेसशी आघाडी केलेले उद्धव ठाकरे या विषयावर अद्यापि गप्प आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपण वडेट्टीवार यांच्या आरोपाशी सहमत आहोत का, हे जाहीर करावे असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंगळवारी दिले. मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात ॲड. उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र वडेट्टीवार हे निकम यांच्यावर बेछूट आरोप करत असताना मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.

(हेही वाचा – Team India Jersey: 2007 ते 2024 या कालावधीत T-20 विश्वचषकात भारताने किती वेळा बदलल्या जर्सी?)

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा नेता पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये खुलेआम करत असताना उद्धव ठाकरे मात्र मूग गिळून गप्प आहेत. हेमंत करकरे हे अजमल कसाब च्या गोळीनेच हुतात्मा झाले हे न्यायालयातही सिद्ध झाले असताना वडेट्टीवार पाकची भाषा बोलत आहेत असा घणाघात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. पाकिस्तानमधील कुणाच्या संपर्कात वडेट्टीवार आहेत असा सवालही त्यांनी केला.

मुंबई हल्ल्याबाबत न्यायालयात सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा कट होता आणि अजमल कसाबच्या गोळीनेच हेमंत करकरे हुतात्मा झाले हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊन पाकिस्तान तोंडघशी पडले होते याचीही आठवण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी करून दिली. शेकडो मुंबईकरांचा जीव घेणा-या अजमल कसाब सोबत काँग्रेस असून भाजपा ॲड. उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.