Dangerous and Dilapidated buildings: मुंबईत १८८ अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारती

'सी-१' श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यादी संकेतस्थळावर जाहीर, तर अशा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1132

मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्या असल्याचे आढळून आले आहे. ‘सी-१’ श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने www.mcgm.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या इमारती राहण्यास धोकादायक असल्यामुळे त्यात वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. (Dangerous and Dilapidated buildings)

मुंबईत १८८ इमारतींना, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ३५४ अन्वये ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित करण्यात आले आहे. यापैकी एकूण २७ इमारती शहर, ११४ पश्चिम उपनगरे आणि ४७ पूर्व उपनगरातील आहेत.  या इमारतींची  यादी बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळाच्या https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/HomePage%20Data/Related%20Links/C1%20Buildings.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.  

या इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी सूचना आणि आवाहन करण्यात आले. तथापि, काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. अशा इमारतींत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी तत्काळ ताबा सोडून सदर इमारत स्वतःहून निष्कासित करावी. उपकर प्राप्त इमारती व इतर धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारती बाबत संबंधित सक्षम प्राधिकरण यांनी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱया नागरिकांची राहील आणि त्यासाठी  महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुनश्च स्पष्ट करण्यात येत आहे. 

‘सी-१’ प्रवर्गातील धोकादायक इमारतींची विभागनिहाय यादी-

ए विभाग:

१) मेहेर मॅन्शन, कूपरेज मार्ग, कुलाबा; २) नोबल चेंबर, जन्मभूमी मार्ग, फोर्ट; ३) जे. के. सोमानी, ब्रिटिश हॉटेल लेन, फोर्ट.

बी विभाग:

 १) पारेख चेंबर, १२५-१२७, शेरीफ देवजी मार्ग; २) २९६, सॅम्यूएल स्ट्रिट.

सी विभाग:

 १) शील भवन, इमारत क्रमांक १४, चौथा मरिन मार्ग, धोबी तलाव.

:डी विभाग:

१) शालीमार एक्झीबिटर्स, ३३५, शालीमार हाऊस, एम.एस.अली मार्ग, ग्रँट मार्ग; २) लोहाना महापरिषद भूवन इमारत, १०, चौथी खेतवाडी लेन, एस.व्ही.पी.मार्ग; ३) सी.एस. क्रमांक ३ ए/७३०, ताडदेव विभाग, १३६, सर्वोदय इस्टेट, सर्वोदय मिल कम्पाऊंड, उर्मी आंगन इमारतजवळ; ४) मेफेअर संकुलामधील दोन बांधकामे (गॅरेज), लीटल गिब्ज मार्ग, मलबार हिल्स; ५) ५१-सी, अमृतसरवाला पंजाबी वाळकेश्वर धर्मशाळा ट्रस्ट इमारत, बाणगंगा; ६) भाटिया निवास, बाणगंगा छेद गल्ली, ७) मेहता महल, मॅथ्यू मार्ग, चर्नी मार्ग, ९) नॉव्हेल्टी सिनेमा, एम. एस. अली मार्ग, ९) ट्रान्झिट कॅम्प क्रमांक ९ व १०, तुळसीवाडी, ताडदेव. 

ई विभाग:

१) त्रिवेणी अपार्टमेंट, मकबा चाळीजवळ, एस. ब्रीज, भायखळा (पश्चिम); २) बॉम्बे सोप फॅक्टरी, हुसैनी बाग, मदनपुरा. 

एफ/दक्षिण विभाग:

१) आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता गल्ली, दादर (पूर्व); २) लालशा बाबा दर्गा मार्ग, तावरीपाडा, डॉ. एस. एस. राव मार्ग, लालबाग. 

जी/उत्तर विभाग-

१) खांडके इमारत क्रमांक ७ आणि ८, आर. के. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम); २) गिरीकुंज इमारत, एल. जे. मार्ग, माहिम; ३) व्हाईट हाऊस, सदनिका क्रमांक ५३४/ए४, टीपीएस III, सी. एस. क्रमांक १२०५, सोनावाला अग्यारी लेन, माहिम (पश्चिम); ४) जनार्दन अपार्टमेंट ए, बी, सी, डी, ई आणि जी विंग, सदनिका क्रमांक ८८६, शंकर घाणेकर मार्ग, दादर (पश्चिम); ५) श्री समर्थ व्यायाम मंदीर, पी. एल. काळे गुरुजी मार्ग, दादर (पश्चिम); ६) कलकत्ता कन्फेक्शनरी ऍण्ड शीतलादेवी इंडस्ट्रीअल इस्टेट, १४०, (तळमजला + १), शीतलादेवी मंदीर मार्ग, माहिम; ७) ३०, रेल व्ह्यू इमारत, सेनापती बापट मार्ग, माहिम स्थानकासमोर, माहिम.

(हेही वाचा – IPL 2024, MI bt SRH : ‘सूर्यकुमार तोडतो!’ हार्दिकची मुंबईच्या विजयानंतर प्रतिक्रिया)

जी/दक्षिण विभाग:

 १) मधुसुदन मील, शंकरराव नरम मार्गावरील उत्तर-पश्चिम दिशेकडील पहिली आणि दुसरी इमारत, सी. एस. क्रमांक ४४५, शंकरराव नरम मार्ग, लोअर परळ. 

एच/पूर्व विभाग:

१) कालिका निवास, नेहरु मार्ग, सांताक्रूझ (पूर्व); २) राठोड मॅन्शन, कलिना-कुर्ला मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पूर्व); ३) युसेफ इमारत, पंडीत जवाहरलाल नेहरु मार्ग, सांताक्रूझ (पूर्व); ४) एअरव्ह्यू ए विंग, झैयतून व्हिला इमारत, टी. एस. क्रमांक २४५९ ते २४६८, २४६९ए आणि २५२७बी ऑफ व्हिलेज कोळेकल्याण, नेहरु मार्ग, बृहन्मुंबई महानगरपालिका मंडईसमोर, सांताक्रूझ (पूर्व); ५) कृष्णकुंज अपार्टमेंट, गोळीबार, कब्रस्तानसमोर, सांताक्रूझ (पूर्व); ६) डिसूजा मॅन्शन, भूखंड क्रमांक ५८,टीपीएस-व्ही, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ (पूर्व); ७) शांती सदन, अशोक नगर, वाकोळा, सांताक्रूझ  (पूर्व), ८) कैलास प्रभात को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सीएसटी मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पूर्व);  ९) राकेश कुंज, सदनिका क्रमांक ५०, टीपीएस-व्ही, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ (पूर्व); १०) सभा इमारत, नित्यानंद हॉटेलजवळ, सीएसटी मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पूर्व).

एच/पश्चिम विभाग:

 १) के. बी. लाल इंडस्ट्रीज, विस्तारित जोड रस्ता, सांताक्रूझ (पश्चिम); २) वोरा इमारत, २ री हसनाबाद लेन, खार (पश्चिम); ३) रिविरिया को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., १५ वा रस्ता, नॉर्थ अव्हेन्यू मार्ग, सांताक्रूझ (पश्चिम); ४) लीला निवास, भूखंड क्रमांक ८३/सी५, मीरा बाग, १७वा रस्ता, सांताक्रूझ (पश्चिम); ५) फँटासिया इमारत, सी/१२२४, वांद्रे गाव, शेर्ले राजन मार्ग, वांद्रे (पश्चिम); ६) सेरेनिटी इमारत, सीटीएस क्रमांक. १०३७ बी, नववा मार्ग, अल्मेडिया उद्यानाजवळ, वांद्रे (पश्चिम); ७)  भूखंड क्रमांक ४२, चिंबई, वांद्रे (पश्चिम); ८) अकबर व्हिला, भूखंड क्रमांक ८३, ८३ ए, सीटीएस क्रमांक. बी२६, हिल मार्ग, वांद्र (पश्चिम); ९) जितेंद्र इमारत, भूखंड क्रमांक २७६, मधू पार्कजवळ, १२वा रस्ता, खार (पश्चिम); १०) लीली व्हिला, शेर्ले राजन मार्ग, वांद्रे (पश्चिम); ११) बांगडीवाल चाळ, ६४, ६६, ६८, बांगडीवाल चाळ, भूखंड ए/५२५ आणि ए/५२८, बझार मार्ग, वांद्रे (पश्चिम); १२) भूखंड क्रमांक ७७/ए, वरोडा मार्ग, वांद्रे (पश्चिम); १३) सनकिस्ट, भूखंड क्रमांक ४७, संत जोसेफ मार्ग, सांताक्रूझ  (पश्चिम); १४) मंगल सरण, १६वा मार्ग, खार (पश्चिम); १५) डलहॉफ बंगलो, संत सेबेस्टीयन होम्स गृहनिर्माण संस्था, भूखंड क्रमांक ११, सीटीएस क्रमांक. बी- ५१३, संत रॉकी मार्ग, वांद्रे (पश्चिम).

के पूर्व विभाग:

१) बंगला क्रमांक १२४, शहीद भगतसिंग को-ऑप.हौसिंग सोसायटी लि., भूखंड क्रमांक १०४, ए. जी. जोडमार्ग, अंधेरी (पूर्व); २) गंगा निवास, जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ, गुंफा मार्ग, जोगेश्वरी (पूर्व); ३) व्हनावटी बंगलो, एफ.पी. क्रमांक ४६९, आझाद मार्ग, विलेपार्ले (पूर्व); ४) एव्हरग्रीन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., ४०२, टिपीएसव्ही,  एन. पी. ठक्कर मार्ग, विलेपार्ले (पूर्व); ५) मणी भुवन, महात्मा गांधी मार्ग, विलेपार्ले (पूर्व); ६) अगरवाल भवन, भूखंड क्रमांक ४८, शेर-ए-पंजाब, अंधेरी (पूर्व); ७) जाल हॉटेल, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि नेहरू मार्ग जंक्शन, विलेपार्ले (पूर्व);  ८) आनंद विहार, भूखंड क्रमांक ३९/४०, शेरे-ए-पंजाब सोसायटी, शेरे-ए-पंजाबसमोर, गुरुद्वारा, अंधेरी (पूर्व); ९) मेहरु मंजिल, चर्च मार्ग, मरोळ अंधेरी (पूर्व); १०) स्मृती इमारत, हिंदूफ्रेन्ड सोसायटी मार्ग, सरस्वती बाग महानगरपालिका शाळेजवळ, जोगेश्वरी (पूर्व); ११) लक्ष्मी सदन, एफ.पी. ३३०, नरिमन मार्ग, चोकसी भवनाजवळ, विलेपार्ले (पूर्व);  १२) महावीर दर्शन गृहनिर्माण संस्था, पी.एम. मार्ग,  विलेपार्ले (पूर्व);  १३) क्लाईड बंगलो, मिस्किटा मार्ग, आझाद मार्ग, विलेपार्ले (पूर्व); १४) सिसीला सागर गृहनिर्माण संस्था, सीटीएस क्रमांक. ४४४, कोंडीविटा गाव, वायरलेस स्टेशनजवळ, जे.बी.नगर, अंधेरी (पूर्व); १५) ड्रिमलँड गृहनिर्माण संस्था, कार्डिनल ग्रेसीअस मार्ग, सीटीएस क्रमांक ६०० चकाला, अंधेरी (पूर्व). 

के/पश्चिम विभाग:

 १) विजय भारत गृहनिर्माण संस्था, साई आयकॉनिक इमारतीजवळ, चार बंगला, जे.पी. मार्ग, लोखंडवाला संकूल, अंधेरी (पश्चिम); २) अंधेरी पुरब-पश्चिम गृहनिर्माण संस्था , २१७, गिल्बर्ट हिल मार्ग, रिक्रिएशन क्लबच्या मागे, अंधेरी (पश्चिम); ३) बंगला क्रमांक १, पाठारे प्रभू ट्रस्ट, भूखंड क्रमांक २५, सीटीएस क्रमांक १४६, टीपीएस-II, जे. पी. मार्ग, नवरंग सिनेमाजवळ, अंधेरी (पश्चिम); ४) मुन्शी भवन, जे. पी. मार्ग, अंधेरी (पश्चिम); ५) बिंद्रा निवास, क्रीडा संकुलासमोर, जे. पी. मार्ग, अंधेरी (पश्चिम); ६) केवलकुंज, भूखंड क्रमांक १८, गुलमोहर छेद मार्ग, जे.व्ही.पी.डी योजना, विले पार्ले (पश्चिम); ७) नमिता इमारत, भूखंड क्रमांक ९, सीटीएस क्रमांक ९ ए/३/३/१, गुलमोहर छेद मार्ग, जे.व्ही.पी.डी योजना, विले पार्ले (पश्चिम); ८) काशी विश्वनाथ रहिवाशी गृहनिर्माण संस्था, भूखंड क्रमांक ४६, जुहू गाव, एन. एस. मार्ग क्रमांक ७, जे.व्ही.पी.डी योजना, विले पार्ले (पश्चिम); ९) हेम निकेतन, भूखंड क्रमांक ५, सुवर्ण नगर सोसायटी, जे.व्ही.पी.डी, विले पार्ले (पश्चिम); १०)  गुणवंत व्हिला, उल्का पॅलेस, भूखंड क्रमांक ८, सीटीएस क्रमांक १२७८, सर्व्हे क्रमांक ८२, वेसावे गाव, सात बंगला; ११) नाझनिन बंगला (शांती निवास), सात बंगला, वेसावे, अंधेरी (पश्चिम); १२) रतनकुंज बंगला, सात बंगला, वेसावे, अंधेरी (पश्चिम); १३) चंदन सिनेमा, सीटीएस क्रमांक ३८ ए, जुहू गाव, जुहू; १४) वैनथेया को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., १९२-बी, एस.व्ही. मार्ग, इर्ला, विलेपार्ले (पश्चिम); १५) शांती व्हिला, दादाभाई मार्ग आणि बजाज मार्ग जंक्शन, विलेपार्ले (पश्चिम); १६) वृजकुंज गृहनिर्माण संस्था, २८, वल्लभभाई पटेल मार्ग,विलेपार्ले (पश्चिम).

एल विभाग:

१) कंथारिया स्टेबल, जरीमरी, अंधेरी-कुर्ला मार्ग; २) कुलदीप सिल्क मिल्क, एमटीएनएल मार्ग, साकीनाका; ३) जॉन्सन अँड जॉन्सन, बच्चू गॅरेजजवळ, साकीनाका; ४) जानकी निवास, बैलबाजार, कुर्ला (पश्चिम); जयराज भुवन इमारत, न्यू मिल मार्ग, कुर्ला (पश्चिम); ६) साखरवाला इमारत, कुर्ला न्यायालय. 

एम पूर्व विभाग:

 १) अनुसया निवास इमारत, सर्व्हे क्रमांक ३४, लिज्जत पापड कंपनीजवळ, बोरला, गोवंडी (पूर्व).

एम/पश्चिम विभाग:

१) भूखंड क्रमांक ३५, सिंधी इमीग्रेंटस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., चेंबूर; २) यदुकुल इमारत, पोस्टल कॉलनी मार्ग, भूखंड क्रमांक २४, चेंबूर; ३) कमल सदन, भूखंड क्रमांक ८, सिंधी सोसायटी, एकविरा मार्ग, एसटी मार्ग, चेंबूर; ४) भूखंड क्रमांक २७८, संत अँथनी मार्ग, चेंबूर; ५) सिंघवी अपार्टमेंट (सुप्रीम हाऊस), १६वा रस्ता; ६) काशी निकेतन, नारायण गजानन आचार्य मार्ग; ७) कृष्णा बाग इमारत क्रमांक १ आणि ४, आर.सी.मार्ग; ८) श्री. साईसदन, बारावा रस्ता, चेंबूर. 

एन विभाग:

 १) शांता भुवन, गंगावाडी, लालबहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम); २) इमारत क्रमांक १, नारायण नगर, लालबहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम); ३) जंजिरा चाळ, राजावाडी मार्ग क्रमांक १, घाटकोपर (पूर्व); ४) गोपाल भुवन, लालबहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), ५) टीन बंगलोज, सीटीएस क्रमांक ३३२० ते ३३३६ घाटकोपर किरोळ गाव, खोत गल्ली, जे.व्ही. मार्ग, घाटकोपर (पश्चिम); ६) गिरीधर नगर इमारत, जीवदया मार्ग, घाटकोपर (पश्चिम); ७) मिलन शॉपिंग सेंटर, नारायणदास मोरारदासजी इमारत, मुख्य शॉपिंग सेंटर, महात्मा गांधी मार्ग, घाटकोपर (पश्चिम); ८) पाटीदार इमारत, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, जीवदया गल्ली, घाटकोपर (पश्चिम); ९) हिरा भवन, लालबहादूर शास्त्री मार्ग, जिनिव्हा रुग्णालयाजवळ, घाटकोपर (पश्चिम); १०) नाथलाल भुवन, गंगावाडी, लालबहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम); ११) जमनादास उमरशी ट्रस्ट इमारत, अंबिका दर्शन इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, घाटकोपर (पूर्व); १२) द घाटकोपर परिमल इमारत गृहनिर्माण संस्था, विक्रांत सर्कल, आर. बी. मेहता मार्ग, घाटकोपर (पूर्व); १३) पारेख मारके परिसर गृहनिर्माण संस्था, ए विंग (तळमजला+३), बी विंग (तळमजला+२), सी विंग (तळमजला+२), डी विंग (तळमजला+१), महात्मा गांधी मार्ग, घाटकोपर (पूर्व). 

पी/उत्तर विभाग:

 १) देव निवास, मामलेतदारवाडी, छेद मार्ग क्रमांक ३, मालाड (पश्चिम); २) इस्माईल बाग, मालाड रेल्वे स्थानकासमोर, आनंद मार्ग, मालाड (पश्चिम); ३) डायमंड अपार्टमेंट, पद्मा नगर, नवीन जोड रस्ता, मालाड (पश्चिम); ४) विनायक सदन, लिबर्टी उद्यान मार्ग क्रमांक १, मालाड (पश्चिम); ५) साई झरुका, बी. जे. पटेल मार्ग, मालाड (पश्चिम); ६) सोमय्या शॉपिंग सेंटर, साईनाथ छेद मार्ग, मालाड (पश्चिम); ७) हरिजीवनदास, रामचंद्र गल्ली, मालाड (पश्चिम); ८) स्मिता इमारत, रामचंद्र गल्ली, मालाड (पश्चिम); ९) साईमंगल गृहनिर्माण संस्था, मालाड रेल्वे स्थानकासमोर, मालाड (पश्चिम); १०) श्री राणी सतीनगर गृहनिर्माण संस्था (बंगलो), जी भूखंड, राणी सतीनगर, स्वामी विवेकानंद मार्ग, मालाड (पश्चिम); ११) इंडियन ऑईल कॉर्पाेरेशन लिमिटेड, स्वामी विवेकानंद मार्ग, मालाड (पश्चिम);   १२) नंदनवन गृहनिर्माण संस्था, रामचंद्र गल्ली, मालाड (पश्चिम);  १३) मणीभवन, मामलेतदार वाडी, मुख्य रस्ता, मालाड (पश्चिम); १४) पोरोकॉल हाऊस ऑफ अवर लेडी ऑफ सी चर्च, मढ आयलँड, मढ मार्ग, मालाड (पश्चिम); १५) ऍनी जे बॅरेटो घर क्रमांक ८३, सीटीएस क्रमांक १६९, मालवणी गाव, मार्वे मार्ग खारोडी, मालवणी, मालाड (पश्चिम); १६) पुष्पा पार्क, जी भूखंड (तळमजला+२), स.का.पाटील रुग्णालयाजवळ, दफ्तरी मार्ग, मालाड (पूर्व); १७) मिस्त्री भुवन, आर. एस. मार्ग, रहेजा टिपकोसमोर, मालाड (पूर्व); १८) भूपेंद्र निवास, जितेंद्र मार्ग, मालाड (पूर्व); १९) हवा हिरा महल, दफ्तरी मार्ग, मालाड (पूर्व); २०) सहकार भुवन, सीटीएस क्रमांक २४९, २४९/१ ते १३ खंडवाला मार्ग, मालाड (पूर्व); २१) श्री. जैन धार्मिक शिक्षण संस्था सोसायटी, जितेंद्र मार्ग, मालाड (पूर्व); २२) तपोवन दीप गृहनिर्माण संस्था, राणी सती मार्ग, आरबीआय क्वार्टर्सच्या मागे, पठाणवाडी, शिवाजी नगर मालाड (पूर्व).  

पी/दक्षिण विभाग:

१) गजानन इमारत क्रमांक ९, सीटीएस क्रमांक ३४, व्हिलेज पहाडी एक्सार, जवाहर नगर, गोरेगांव (पश्चिम); २) मणीभुवन इमारत, स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगांव (पश्चिम); ३) आशिष इमारत, स्वामी विवेकानंद मार्ग, विजय सेल्ससमोर, गोरेगांव (पश्चिम); ४) प्रभू निवास, भूखंड क्रमांक ९९, जवाहर नगर, रस्ता क्रमांक १०, गोरेगांव (पश्चिम); ५) लक्ष्मी निवास इमारत, टिळक नगर, भोसले मार्गाजवळ, गोरेगांव (पश्चिम); ६) कुंदन, जे. पी. मार्ग क्रमांक ३, गोरेगांव (पूर्व); ७) समाधान, जे. पी. मार्ग क्रमांक ३, गोरेगांव (पूर्व); ८) अमीर मॅन्शन, ९२, जयप्रकाश नगर, गोरेगांव (पूर्व).

आर/मध्य विभाग:

 १) मुलतानी चाळ स्ट्रक्चर क्रमांक ३९०, एफ.पी. क्रमांक ५८, टीपीएस-III, स्वामी विवेकानंद मार्ग, उमेद आश्रम, बोरिवली (पश्चिम); २) मुलतानी चाळ स्ट्रक्चर क्रमांक ३९१, एफ. पी. क्रमांक ५८, टीपीएस-III, एस.व्ही. मार्ग, उमेद आश्रम, बोरिवली (पश्चिम); ३) मुलतानी चाळ स्ट्रक्चर क्रमांक ३९२, एफ. पी. क्रमांक ५८, टीपीएस-III, एस.व्ही. मार्ग, उमेद आश्रम, बोरिवली (पश्चिम); ४) मुलतानी चाळ स्ट्रक्चर क्रमांक ३९३, एफ.पी. क्रमांक ५८, टीपीएस-III, एस.व्ही. मार्ग, उमेद आश्रम, बोरिवली (पश्चिम); ५) राम नगर ट्रस्ट १, इमारत १, रामनगर मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, बोरिवली (पश्चिम); ६) राम नगर ट्रस्ट १, इमारत २, रामनगर मार्ग, स्वामी विवेकानंद  मार्ग, बोरिवली (पश्चिम); ७)  ज्ञाननगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., श्री वर्धमान स्थानकवाडी जैन संघ, लोकमान्य टिळक मार्ग, डायमंड टॉकीजसमोर, बोरिवली (पश्चिम); ८) सत्यभामा निवास इमारत क्रमांक ०२, कस्तुरबा मार्ग क्रमांक ०१, कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या मागे, बोरिवली (पूर्व); ९) सत्यभामा निवास इमारत क्रमांक ०१, कस्तुरबा मार्ग क्रमांक ०१, कस्तुरबा पोलिस स्टेशनच्या मागे, बोरिवली (पूर्व); १०) गणेश भुवन, एफ.पी. क्रमांक ७, ठक्कर मॉलच्या समोर, स्वामी विवेकानंद मार्ग, बोरिवली (पश्चिम); ११) लक्ष्मी भुवन, सदनिका क्रमांक ६, ठक्कर मॉल, स्वामी विवेकानंद मार्ग, बोरिवली (पूर्व); १२) गीतेश हरिष दावणकर चाळ, विष्णू निवास, टीपीएस-III, एफ. पी. क्रमांक ६६४, आर. एम. भट्टड मार्ग, बोरिवली (पश्चिम); १३) त्रिमूर्ती गृहनिर्माण संस्था, कार्टर मार्ग क्रमांक ३, बोरिवली (पूर्व); १४) गुलाब मॅन्शन, महाराष्ट्र नगर, महाराष्ट्र नगर गल्ली, बोरिवली (पश्चिम); १५) सिद्धार्थ बोरिवली गृहनिर्माण संस्था, फॅक्टरी गल्ली, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली (पश्चिम); १६) इंद्रपुरी गृहनिर्माण संस्था, इंद्रपुरी इमारत, जयराज नगर, एमएचबी पोलिस स्थानकासमोर, जोड रस्ता, बोरिवली (पश्चिम); १७) गीता भवन, कार्टर मार्ग क्रमांक ६, बोरिवली (पूर्व); १८) अंबा भवन, कार्टर मार्ग क्रमांक ७, बोरिवली (पूर्व); १९) हिम्मत नगर गृहनिर्माण संस्था, सीटीएस क्रमांक ४४७-२ बोरिवली गाव, जिमखाना मार्ग, एमसीएफ क्लबजवळ, बोरिवली (पश्चिम). 

आर/उत्तर विभाग:

१) शिवगुरू गृहनिर्माण संस्था, जयवंत सावंत मार्ग, दहिसर (पश्चिम).

आर/दक्षिण विभाग:

 १) पॅराडाईज इमारत, शांतीलाल मोदी मार्ग, कांदिवली (पश्चिम); २) कुंदी दीप, इराणीवाडी मार्ग क्रमांक ३, कांदिवली (पश्चिम); ३)विजय महल, कस्तुरबा मार्ग, कांदिवली (पश्चिम); ४) साई हेवन, पोईसर, स्वामी विवेकानंद मार्ग, कांदिवली (पश्चिम); ५) सुकन गृहनिर्माण संस्था, सीटीएस क्रमांक ११८०, महात्मा गांधी छेद क्रमांक ३, कांदिवली (पश्चिम); ६) कांती टेरेस, स्टेशन मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, कांदिवली (पश्चिम); ७) जयहिंद दाल मिल, फोन्सेका कम्पाऊंड, आर्कुर्ली मार्ग, कांदिवली (पूर्व); ८) कल्पतरू गृहनिर्माण संस्था, मथुरादास मार्ग, पंजाब नॅशनल बँकेसमोर, कांदिवली (पश्चिम). 

एस विभाग:

१)  कमल विहार, लालबहादूर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम); २) सुजल अपार्टमेंट क्रमांक ३ गृहनिर्माण संस्था, भूखंड क्रमांक ८७, दातार मार्ग, भांडुप (पूर्व); ३) उलवेकर इमारत, रवी स्वागत गृहनिर्माण संस्थेच्या पाठीमागे, बापूसाहेब जुवेकर मार्ग भांडुप (पूर्व). 

(हेही वाचा – धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे भारतरत्न Pandurang Waman Kane यांच्याबद्दल जाणून घेऊया )

टी विभाग-

१)  श्याम भुवन, श्याम भुवन गोखले मार्ग, मुलुंड (पूर्व); २) सोट्टा भुवन आणि जलाराम भुवन, लोकमान्य टिळक मार्ग, रेल्वे स्थानकासमोर, मुलुंड (पूर्व); ३) अभिजित इमारत, बी. के. मार्ग, मुलुंड (पूर्व); ४) लक्ष्मी-छाया, लक्ष्मी-छाया इमारत, नवघर गल्ली क्रमांक १, नवघर मार्ग, मुलुंड (पूर्व); ५) रमानी भुवन, आर. आर. टी. मार्ग, मुलुंड (पश्चिम); ६) ब्रह्मज्योती, ब्रह्मज्योती इमारत ‘बी’ (मिरानी नगर), गणेश गावडे मार्ग, मुलुंड (पश्चिम); ७) महामाया, महामाया इमारत, गणेश गावडे मार्ग, मुलुंड (पश्चिम); ८) वल्लभ भुवन, वालाजी लढ्ढा मार्ग, मुलुंड (पश्चिम); ९) एकविरा सदन, एन. एस. रस्ता, मुलुंड (पश्चिम); १०) पुष्पा निवास, ए आणि बी विंग, महात्मा गांधी मार्ग आणि आर. पी. रस्ता जंक्शन, मुलुंड (पश्चिम); ११) गिरीराज ब्रिजवासी भुवन, बी इमारत, सी.टी.एस. क्रमांक १३४२बी, डॉ. गजानन पुरंदरे मार्ग, वालाजी लढ्ढा मार्ग, मुलुंड (पश्चिम); १२) महादेव निवास, आर. एच. बी. रस्ता आणि एस. एल. रस्ता जंक्शन, मुलुंड (पश्चिम); १३) बाल स्मृती इमारत, मुरार मार्ग, मुलुंड (पश्चिम); १४) सुशीला सदन, गायवाला इमारत, महात्मा गांधी मार्ग, मुलुंड (पश्चिम); १५) प्रागजी सुंदरजी (मोची) इमारत, भूखंड क्रमांक ८२१, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, मुलुंड पोलिस स्थानकाजवळ, मुलुंड (पश्चिम); १६) नीलकेतन इमारत, सीटीएस क्रमांक १४५४ ए, कस्तुरबा मार्ग, मुलुंड (पश्चिम).  (Dangerous and Dilapidated buildings)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.