Arvind Kejriwal यांना दुहेरी झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, २० मेपर्यंत कोठडी

98
Arvind Kejriwal यांमद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सर्वोच्च न्यायालयात जमीन अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. यावर पुढील सुनावणी ९ मे पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिल्ली न्यायालयाने केजरीवाल त्यांच्या पोलीस कोठडीत २० मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ईडीने काय केला युक्तीवाद?

अरविंद केजरीवाल हे दहशतवादी नाहीत. ते कायदा मानणार आहेत. कायद्याचा भंग करणारे नाहीत. अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal)  यांना अंतरिम जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद अरविंद केजरीवाल यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. यावर नेता अपवाद असतात का, निवडणुकीत प्रचार करणे खरेच एवढे आवश्यक आहे का, असे प्रश्न ईडीकडून उपस्थित करण्यात आले. ईडीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, अरविंद केजरीवाल हे २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान सेव्हन स्टार ग्रँड हयात हॉटेलमध्ये थांबले होते. त्याचे बिल चनप्रीत सिंग यांनी दिले होते. सिंह यांच्यावर आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी यांनी रोख स्वीकारल्याचा आरोप आहे. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित नाही. आम्ही राजकारणाशी संबंधित नाही. आमचा संबंध फक्त पुराव्यांशी आहे आणि आमच्याकडे पुरावे आहेत, अशी बाजू  ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी मांडली.
या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal)  यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले नव्हते. मात्र, यानंतर केलेल्या तपासातून अरविंद केजरीवाल यांची या प्रकरणातील भूमिका स्पष्ट होत गेली, असेही ईडीकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.