Ramdas Athawale: भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत; रामदास आठवलेंची राहुल गांधींवर घणाघाती टीका

106
Ramdas Athawale: भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत; रामदास आठवलेंची राहुल गांधींवर घणाघाती टीका
Ramdas Athawale: भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत; रामदास आठवलेंची राहुल गांधींवर घणाघाती टीका

भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत, अशी घणाघाती टीका रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केली आहे. इंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. काँग्रेसच्या (Congress) काळात ती मागणी पूर्ण झाली नाही. सध्या लोकांची दिशाभूल, लोकांमध्ये फूट पाडणं सुरू आहे. मला लोकसभेसाठी जागा मिळालेली नाही, पण मी महायुतीबरोबरच आहे, असे आठवले (Ramdas Athawale) म्हणाले आहेत.

(हेही वाचा)- Toll Rates : वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोल शुल्कात १८ टक्क्यांनी वाढ, ‘हे’ आहेत सुधारित दर

रामदास आठवले (Ramdas Athawale) पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपला देश प्रगती करत आहे. इंडिया आघाडीचे लोक म्हणत आहेत, मोदी पुन्हा निवडून आले तर देशाचं संविधान बदलतील. पण मोदी असं अजिबात करणार नाही. देश कुणी तोडू शकत नाही. राहुल गांधींवर आता भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढायची वेळ आली आहे. तुमच्या कार्यकाळात तुम्ही भारत का जोडला नाही? त्यामुळे तुमच्यावर आज ही वेळ आली आहे. राहुल गांधी यांनी कायम देश तोडण्याचं काम केलं आहे. आता ते देश जोडायला निघाले आहेत.” (Ramdas Athawale)

शिर्डी मतदारसंघासाठी आठवलेंची मागणी

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हे विधान केलं आहे. शिर्डी मतदारसंघासाठी आठवलेंची मागणी होती. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नसतानाही मोदी सरकारला पाठींबा देण्यामागचं कारण सांगताना आठवले म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांसोबत सुमारे एक तास चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की, शिर्डीतून उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केला. पण, एकनाथ शिंदे यांनी आग्रह केला की, त्यांच्यासोबतच्या खासदारांना संधी देण्याची आवश्यकता आहे, सदाशिव लोखंडे आमचे मित्र आहेत. पण, मला कॅबिनेट मंत्री पद देण्याचं आश्वासन दिलं असून एखादं राज्य मंत्री पदही आमच्या वाट्याला येईल.” असं आठवले म्हणाले आहेत. (Ramdas Athawale)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.