Siva Balakrishna ACB Raids : तेलंगणाच्या ‘या’ अधिकाऱ्याकडे सापडले तब्बल ४० लाख रोख, दोन किलो सोनं आणि बरच काही

बालकृष्ण यांनी त्यांच्या कमाईपेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून अधिकाऱ्यांनी बालकृष्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची घरे आणि कार्यालयांसह राज्यभर अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

166
Siva Balakrishna ACB Raids : तेलंगणाच्या 'या' अधिकाऱ्याकडे सापडले तब्बल ४० लाख रोख, दोन किलो सोनं आणि बरच काही

तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली आहे. यामधून जवळपास १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (२४ जानेवारी) तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीचे (TSRERA) सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस. बालकृष्ण (Siva Balakrishna ACB Raids) यांच्या निवासस्थानासह विविध ठिकणी छापेमारी केली.

(हेही वाचा – Nashik ATS : इसिसचे नाशिक कनेक्शन; दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी हुजेफ अजीजशेख अटकेत)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १४ पथकांची कारवाई – 

मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १४ पथकांनी काल दिवसभर तपास सुरू केला. त्यानंतर आजही पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Siva Balakrishna ACB Raids) तपास सुरू करण्यात येणार आहे. एस. बालकृष्ण यांच्या निवास्थानावर, कार्यालयांवर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीदरम्यान १०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली.

एसीबीच्या प्राथमिक निष्कर्षांवरून असे सूचित होते की बालकृष्ण यांनी अनेक स्थावर मालमत्ता कंपन्यांना परवाने मिळवून कोट्यवधी रुपयांची कमाई केली.

(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : इंग्लिश संघाने नाणेफेकीच्या आधीच जाहीर केला पहिल्या कसोटीसाठीचा अंतिम संघ)

बालकृष्ण यांनी त्यांच्या कमाईपेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून अधिकाऱ्यांनी बालकृष्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची घरे आणि कार्यालयांसह राज्यभर अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. (Siva Balakrishna ACB Raids)

१०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता सापडली – 

या छाप्यांमध्ये सोने, घार, बँक ठेवी आणि बेनामी मालकीसह १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची (Siva Balakrishna ACB Raids) मालमत्ता सापडली आहे. जप्त केलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये ४० लाख रोख, दोन किलो सोन्याचे दागिने, ६० महागडी घड्याळे, मालमत्तेची कागदपत्रे आणि मोठ्या बँक ठेवींचा समावेश आहे. याशिवाय, १४ फोन, १० लॅपटॉप आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

(हेही वाचा – Rajasthan Surya Namaskar : रथसप्तमीला राजस्थान करणार ‘हा’ अनोखा जागतिक विक्रम)

एसीबी आता बालकृष्ण यांच्या बँक लॉकर आणि इतर अघोषित मालमत्तांची तपासणी करत आहे. (Siva Balakrishna ACB Raids)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.