Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्यावर माजी आमदार लक्ष्मण माने यांची टीका; म्हणाले…

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही, असा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला.

181
Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्यावर माजी आमदार लक्ष्मण माने यांची टीका; म्हणाले...
Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्यावर माजी आमदार लक्ष्मण माने यांची टीका; म्हणाले...

मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनावर माजी आमदार आणि ‘उपरा’कार लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी टीका केली आहे. ‘मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही. त्यामुळे जरांगे हे मनूवादी वृत्तीचे असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (obc reservation) देण्याच्या मागणीला विरोध आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिल्यास मागासवर्गीय जातींवर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे, अशी लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो

लक्ष्मण माने पुढे म्हणाले की, ”ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला सर्व स्तरांतून विरोध होत असतानाही जरांगे ओबीसीतून आरक्षण मिळावे, ही मागणी करत आहे. त्यासाठी ते दबावतंत्र वापरत आहेत. मात्र, देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो, त्यामुळे संविधान असेपर्यंत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही.”

आरक्षणाची गरज आहे का ?

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे वर्चस्व आहे. आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. सर्वाधिक आमदार, खासदार मराठा समाजाचे आहेत. सहकारी संस्था त्यांच्या हातामध्ये असून, सर्वच क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व असतानाही त्यांना आरक्षणाची गरज का पडत आहे, याचा विचार मराठा समाजाने करावा, असे आवाहन लक्ष्मण माने यांनी केले आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.