BMC : विद्याविहार पुलाचा खर्च आणखीन वाढला : ८८ कोटींवरून पोहोचला १७६ कोटी रुपयांवर

489
BMC : विद्याविहार पुलाचा खर्च आणखीन वाढला : ८८ कोटींवरून पोहोचला १७६ कोटी रुपयांवर
BMC : विद्याविहार पुलाचा खर्च आणखीन वाढला : ८८ कोटींवरून पोहोचला १७६ कोटी रुपयांवर

सचिन धानजी, मुंबई

विद्याविहार रेल्वे स्थानकावरील (Vidyavihar Bridge) एल.बी.एस मार्ग व आर.सी मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे संपूर्ण काम हाती जेवढ्या किमतीत होणार होते, त्यापेक्षा अधिक किमतीत रेल्वे हद्दीतील का खर्च झाला आहे. त्यामुळे या पुलाच्या पोहोच रस्त्याचा खर्च आणखी ७६ कोटींनी वाढला गेला आहे. (BMC) त्यामुळे आधीच मंजूर ८८ कोटींच्या कामात १२ कोटींनी वाढ झालेली असताना आता त्यात आणखीन ७६ कोटींचा खर्च वाढल्याने या पुलाच्या कामाचा खर्च ८८ कोटी रुपयांवरून थेट एकूण१७६ कोटींवर जावून पोहोचला आहे.

(हेही वाचा – Rajasthan Surya Namaskar : रथसप्तमीला राजस्थान करणार ‘हा’ अनोखा जागतिक विक्रम)

विद्याविहार पश्चिमेकडील रामदेव पीरमार्ग (Ramdev Pir Marg) व बस डेपो जंक्शनवर या पुलामुळे वाहतुकीला अडथळा होणार आहे. त्यामुळे या पुलाची लांबी पश्चिम बाजुला १३३ मीटर लांब आणि पुलाच्या पश्चिम व पूर्व बाजुला ६१३ मीटर लांबीच्या पोहोच रस्त्यांचे काम अंतर्भूत करण्यात आले. त्यामुळे या वाढीव कामावर आणखी ७६ कोटींचा खर्च वाढला.

खर्च ८८ कोटी रुपयांवरून १०० कोटींवर पोहोचला

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या मूळ आराखड्यानुसार प्रकल्पाची लांबी ४८० मीटर एवढी होती व रेल्वे हद्दीमध्ये पुलाचे काम स्टीलमध्ये तर रेल्वे हद्दीबाहेर काँक्रिट तुळई अर्थात गर्डर वापरुन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तांत्रिक सल्लागाराने आराखडा तयार केला होता. सन २०१६ आणि त्यानंतर २०१८ नुसार हा आराखडा बनवला होता. पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात सन २०१९-२०मध्ये सुरू झाल्याने रेल्वेने या पुलाचा आराखडा २०२० नुसार बनवला. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने आयआयटीने सुचवल्यानुसार ओपन वेब गर्डरद्वारे बांधकाम करण्याचे सुचवल्याने यसाठी ११०० मेट्रीक टन ऐवजी २०६९ मेट्रीक टन स्टीलचा वापर झाला. त्यामुळे नवीन आराखड्यानुसार पुलाच्या बांधकामाचा जो निधी मंजूर केला होता, तेवढ्या किंमतीत केवळ रेल्वे रुळाच्या हद्दीतीलच काम करता आले. उलट अधिक १२ कोटींचा खर्च रेल्वे रुळ हद्दीतील कामावर वाढला. रेल्वे रुळावरील पुलाचे काम करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त बाबींच्या वापरामुळे हा खर्च ८८ कोटी रुपयांवरून १०० कोटींवर पोहोचला.

(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : इंग्लिश संघाने नाणेफेकीच्या आधीच जाहीर केला पहिल्या कसोटीसाठीचा अंतिम संघ)

पश्चिम बाजुला १३३ मीटर लांबी वाढवली

त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या पोहोच मार्गाच्या कामासाठी नव्याने निविदा मागवून कंत्राटदारांची निवड केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्या यानुसार,या पुलाची लांबी मूळ आराखड्यात ४८० मीटर एवढी ग्राह्य धरली होती, परंतु विद्याविहार पश्चिमेकडील रामदेव पीर मार्ग व बस डेपोवर या पुलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने पुलाच्या पश्चिम बाजुला १३३ मीटर लांबी वाढवण्यात आली व पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजुस लोखंडी तुळई वापरुन करण्याचा सुधारीत आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये ६१३ मीटर लांबीचे बांधकाम सूचवण्यात आले. योगायोग की कंत्राटदाराची किमया म्हणावी, पहिले काम सुरू असलेल्या कंपनीलाच पोहोच मार्ग बांधण्याचे दुसरे काम मिळाले. या दोन्ही कामासाठी ए. बी. इंफ्राबिल्ड (A. B. Infrabuild) ही कंपनी पात्र ठरली.

मूळ कंत्राट किंमत : ८८.४२ कोटी रुपये

अतिरिक्त व जादा रक्कम : १२.०३ कोटी रुपये

एकूण कंत्राट किंमत : १००.४५ कोटी रुपये

पुलाच्या पोहोच मार्गाच्या वाढीव खर्च : ७६ कोटी रुपये

विद्याविहार पुलाचा एकूण खर्च : १७७ कोटी रूपय

असे पुलाचे बांधकाम..

पुलाची लांबी : रेल्वे हद्दीतील काम वगळून ५१३.६६ मीटर

पुलाची रुंदी : दोन्ही बाजूस १७.५० मीटर

कालावधी : पावसाळा वगळून १८ महिने

रेल्वे जमिनीचा भाग : पूर्व बाजूस १२० मीटर

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.