Ind vs Eng 1st Test : इंग्लिश संघाने नाणेफेकीच्या आधीच जाहीर केला पहिल्या कसोटीसाठीचा अंतिम संघ

इंग्लंडने आपल्या बॅझ-बॉल रणनीतीला सुरुवात करत सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम अकरा जणांचा संघ जाहीर केला. भारतीय संघही तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळेल हे नक्की आहे.

145
Ind vs Eng 1st Test : इंग्लिश संघाने नाणेफेकीच्या आधीच जाहीर केला पहिल्या कसोटीसाठीचा अंतिम संघ

ऋजुता लुकतुके

पाहुण्या इंग्लिश संघाने हैद्राबाद कसोटीसाठी (Ind vs Eng 1st Test) अंतिम अकरा जणांचा संघ एक दिवस आधीच म्हणजे बुधवारी २४ जानेवारीला जाहीर केला, आणि विशेष म्हणजे या संघात ४ फिरकी गोलंदाज आणि एक तेज गोलंदाज आहे. म्हणूनच कदाचित सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला होता, ‘जो रुट कदाचित गोलंदाजीची सुरुवात करू शकतो.’ म्हणजे सुरुवातीला तेज किंवा मध्यमगती गोलंदाज लागला तर जो रुट वेळ मारुन नेईल, असं इंग्लिश संघाला वाटतं.

बॅझ-बॉल रणनीती – 

इंग्लिश संघाच्या आक्रमक बॅझ-बॉल रणनीतीचाच हा भाग आहे. सुरुवातीपासून आक्रमक (Ind vs Eng 1st Test) विचार करण्याचा संघाचा प्रयत्न दिसतोय. भारतीय संघही तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळेल हे नक्की आहे. स्टेडिअमची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल असा अंदाज सगळ्यांनीच व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – बंगाली नाट्यलेखनाचे प्रणेते Michael Madhusudan Dutt)

पण, त्यावरून इंग्लंड संघाने चक्क चार फिरकी गोलंदाज खेळवायचं ठरवलं आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टले कसोटी पदार्पण करणार आहे.

‘या’ खेळाडूंचा संघात समावेश –

ऑली पॉप, बेन फोक्स, रेहान अहमन आणि जॅक लीच (Ind vs Eng 1st Test) यांचाही इंग्लिश संघात समावेश करण्यात आला आहे. शेवटच्या ॲशेस कसोटी मालिकेत हे चार खेळाडू खेळले नव्हते. पण, देशांतर्गत काऊंटी क्रिकेटमधील कामगिरी बघून त्यांचा संघात समावेश झाला आहे.

(हेही वाचा – Nashik ATS : इसिसचे नाशिक कनेक्शन; दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी हुजेफ अजीजशेख अटकेत)

पहिल्या हैद्राबाद कसोटीसाठी इंग्लिश संघ,

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पॉप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड व जॅक लीच (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.