Lok Sabha Election 2024 : ऐन रणधुमाळीत धुळ्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का; प्रदेश सरचिटणीसाचा भाजपामध्ये प्रवेश

149
Lok Sabha Election 2024 : ऐन रणधुमाळीत धुळ्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का; प्रदेश सरचिटणीसाचा भाजपामध्ये प्रवेश

राज्यात लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते मंडळी ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. तिसऱ्या टप्प्यापर्यंत मतदान पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. धुळे जिल्ह्यात मात्र राजकीय परिस्थिती वेगळी आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसला (Dhule Congress) ऐन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावरच जोरदार धक्का बसला आहे. नाशिक ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळे (Tushar Shewale) यांनी सोमवारी धुळ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar baawankule) यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. धुळ्यात कॉंग्रेसकडून डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bacchhav) यांना उमेदवारी दिल्याने ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यामुळेच त्यांनी ऐनवेळी कॉंग्रेसला धक्का दिल्याचे बोलले जात आहे.  (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याचा ‘मोठा’ निर्णय)

उमेदवारी न मिळाल्याने शेवाळेंची नाराजी

तुषार शेवाळे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते धुळे व नाशिक जिल्ह्यात ते चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले होते. काँग्रेसतर्फे यंदा धुळे लोकसभेसाठी डॉ. शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हे प्रबळ दावेदार असतानाही त्यांचा पत्ता कट करत नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव यांना धुळ्यातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शेवाळे नाराज झाल्याचे दिसून आले होते.

(हेही वाचा – IPL 2024, Playoffs Scenario : बाद फेरीसाठी बंगळुरू वि चेन्नई सामन्याचं गणित काय आहे)

मालेगावचे डॉ. ठाकरेही भाजपात

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून तुषार शेवाळे यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे शेवाळे नाराज होते. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या तुषार शेवाळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. तुषार शेवाळे यांच्यासोबत मालेगाव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे (Dr. Rajendra Thackeray) यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.