Nashik ATS : इसिसचे नाशिक कनेक्शन; दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी हुजेफ अजीजशेख अटकेत

152
Nashik ATS : इसिसचे नाशिक कनेक्शन; दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी हुजेफ अजीजशेख अटकेत
Nashik ATS : इसिसचे नाशिक कनेक्शन; दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी हुजेफ अजीजशेख अटकेत

पुणे, पडघा पाठोपाठ आता नाशिकमधील इसिस मॉड्यूल समोर येत आहे. नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एका धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. हुजेफ अब्दुल अजीजशेख असे ATS ने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Nashik ATS)

(हेही वाचा – सुदामो या टोपण नावाने लिहिणारे बालसाहित्यिक Ramanlal Soni)

31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी

नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने (Anti Terrorism Squad) हुजेफ अब्दुल अजीजशेख याला अटक केली आहे. इसिस (ISIS) आणि इंडियन मुजाहिदीन (Indian Mujahideen) या दहशतवादी संघटनांना फंडिंग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने हुजेफ अब्दुल अजीजशेख (Hujef Abdul Aziz Sheikh) याला न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

उच्चशिक्षित आणि खासगी कंपन्यांमध्ये भागीदार

हुजेफ अब्दुल अजीजशेख हा उच्चशिक्षित आणि अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. आरोपीच्या घराच्या झडतीत एटीएसने 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत केला आहे. संशयित हुजेफ शेख सीरियामधील (Syria) राबिया उर्फ उम ओसामा या इसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याची एटीएसची माहिती आहे.

(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा)

शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक (Karnataka), बिहार, तेलंगणामध्ये एटीएसची पथके पोहोचली आहेत. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

मागील महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापेमारी करून साकीब नाचणसह (Saqib Nachan) इतर 14 जणांना ताब्यात घेतले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.