शिवसेनेचा वर्धापनदिन हॉटेलमध्ये साजरा होणार!

111
राज्यसभा निवडणूक जबरदस्त फटका बसल्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत ताकही फुंकून पिण्याचे धोरण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना हॉटेल वेस्ट इन मध्ये ठेवले आहे. मात्र रविवार, १९ जून रोजीच शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. हा वर्धापनदिन शिवसेना याचा हॉटेलमध्ये साजरा करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार 

वर्धापनदिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यानिमित्ताने ऑनलाईन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहे, असे राऊत म्हणाले. विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पक्षांनी खबरदारी म्हणून आमदारांना एकत्र ठेवले आहे. शिवसेनेने आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने २ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडील संख्याबळ पाहता त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे सगळे आमदार आणि समर्थक आमदार बैठकीला जमले आहेत. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत. अतिरिक्त मते कुणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आहे अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर आदित्य ठाकरे हेदेखील आमदारांशी संपर्क ठेवून आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.