भाजपचा पाचवा उमेदवार गणिताच्या आधारे उभा केलाय, निवडून येण्याचा विश्वास – देवेंद्र फडणवीस

108
कोणताही पक्ष हा आपला उमेदवार जिंकावा यासाठी प्रयत्न करतो, राजकारणात कोणीही दुसऱ्या पक्षाचा उमेदवार जिंकवण्यासाठी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार धोक्यात टाकू शकत नाही. भाजपाने पाचवा उमेदवार उभा केला आहे, तर गणिताच्या आधारे केला आहे हे महाविकास आघाडीला माहिती आहे. त्यामुळे कुणाला याचा फटका बसणार याच्या नादात ते एकमेकांचे आमदार फोडत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना नाना पटोले गंमतीदार बोलतात ते ऐकायचे आणि सोडून द्यायचे असते. १० तारखेला राज्यसभेच्या निकालात महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला आहे. परंतु आता भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून आल्यानंतर विधान परिषद निकालानंतर तो कोसळेल. तुम्ही सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपली रणनीती यशस्वी होईल, असा दावा आमदारांशी बोलताना फडणवीस यांनी केला.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवसेनेने सचिन आहिर, आमश्या पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.