MGNREGA scheme : मनरेगा योजनेतून ५० मजूर जोडप्यांची निवड

स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावर घडणार वैविध्यपूर्ण भारताचे दर्शन

115
MGNREGA Wages : मनरेगा अंतर्गत मिळणारा पगार तुटपुंजा, संसदीय समितीचा ठपका
MGNREGA Wages : मनरेगा अंतर्गत मिळणारा पगार तुटपुंजा, संसदीय समितीचा ठपका

यावर्षीचा ७७ व्या स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष असणार आहे. कारण वैविध्यपूर्ण भारताचे लाल किल्ल्यावर दर्शन घडणार असून प्रथमच मजुरांना विशेष सन्मान देण्यात आला आहे. यासाठी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात काम करणारे मजूरांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात मनरेगा योजनेतून ५० मजूर जोडप्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण होईल एवढं नक्की.

यावेळी स्वातंत्र्य दिनाची थीम जी-२० आहे. यावेळी विविध राज्यांतून ७२ जोडप्यांना बोलावण्यात आले असून त्यात मनरेगा योजनेतून ५० मजूर जोडप्यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, ५५०० लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे, ज्यामध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात काम करणारे मजूर देखील असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी ७७ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ९ व्यांदा ध्वजारोहण करणार आहेत. यासाठी दिल्लीतील लाल किल्ल्याभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल किल्ल्यापासून ३०० मीटर परिसरात पॅरा मिलिटरी फोर्स तैनात करण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट रोजी दिल्ली विमानतळावर अनुसूचित नसलेल्या फ्लाइटच्या टेकऑफ आणि लँडिंगवर काही तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत १६ ऑगस्टपर्यंत ड्रोन आणि पॅराग्लायडिंगवर बंदी असेल.

(हेही वाचा – Shirpur Riots : पोस्टर फाडल्याने दोन गटात तुफान दगडफेक; सांगवी गावात संचारबंदी)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ६ ते सकाळी १० आणि दुपारी ४ ते ७ या वेळेत नॉन शेड्युल्ड फ्लाइट्सवर बंदी असेल. यासाठी एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन सर्व्हिस (AIS) ने एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना नोटीस जारी केली आहे. मात्र, नियोजित उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही. ही सूचना भारतीय हवाई दल, सीमा सुरक्षा दल आणि आर्मी एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरसाठी लागू होणार नाही. याशिवाय राज्यपाल आणि मुख्यमंत्री प्रवास करणार असलेल्या राज्य हेलिकॉप्टरला परवानगी दिली जाईल. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने २२ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत ड्रोन, पॅराग्लायडिंग आणि हॉट एअर बलून उडवण्यास बंदी घातली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी हा आदेश जारी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.