Earthquake : तुर्कस्तानमध्ये पुन्हा मोठा भूकंप, अनेक जण जखमी; जपान, अंदमान देखील हादरलं

भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून आदियमनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

129
Earthquake : तुर्कस्तानमध्ये पुन्हा मोठा भूकंप, अनेक जण जखमी; जपान, अंदमान देखील हादरलं

गुरुवारी (१२ आॅगस्ट) रात्री तुर्कस्तानच्या दक्षिण भागात ५.२ रिश्टर स्केलचा (Earthquake) भूकंप झाला. भूकंपामध्ये २३ लोक जखमी झाले आहेत.

भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू मालत्या प्रांतातील येसिलर्ट शहरात होता. भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून आदियमनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या दोन्ही प्रांताचे फेब्रुवारीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे (Earthquake) मोठे नुकसान झाले. ज्यामध्ये ५०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. काल रात्री झालेल्या भूकंपामुळे अनेकजण जखमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

(हेही वाचा –   IND vs WI : शेवटच्या सामन्यांपूर्वी भारतीय खेळाडू करतायत अमेरिका भ्रमंती)

अंदमान निकोबार बेटांवरही भूकंप

गुरुवारी रात्री भारताच्या पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटांवर ४.३ तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) च्या माहितीनुसार पहाटे २.५६ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएस नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.