धारावीतील रॅपर्सकडून Rahul Shewale यांना अनोखी भेट; राहुल शेवाळे जैसा है कौन? गाण्याने घातला धुमाकूळ

126

दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचे समर्थन करा, असे सांगत त्यांच्या कामाचा आढावा घेणारे रॅप सॉन्ग धारावीमधील रॅपर्सने बनवले आहे. या रॅपर्सने बनवलेल्या या गाण्याने धारावीत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे स्थानिक खुश झाले आहे.

(हेही वाचा Shrikant Shinde यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाच वर्षांचे मांडले व्हिजन ; कोस्टल रोड, फ्री वे, मेट्रो आणि बरेच काही…)

धारावीतील रॅपर टोनी सेबॅस्टियन याने स्वतःहून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी एक रॅप तयार केले. या गाण्यात शेवाळे (Rahul Shewale) यांच्या खासदरकीच्या कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. त्यांचे मुंबईच्या विकासासाठी असलेले व्हिजन याबाबत माहिती या गाण्यात दिली आहे. “राहुल शेवाळे जैसा है कौन?” असा थेट प्रश्न या रॅपमध्ये टोनी यांनी विचारला आहे. हे रॅप तयार करून टोनी यांनी आपल्या मित्राच्या सोशल मीडियावर पोस्ट केले. आता हे रॅप गात टोनी आणि त्यांचे मित्र धारावीतील गल्ल्यांमध्ये फिरून जनजागृती करत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.