Arvind Kejriwal कारागृहाबाहेर आल्याने काँग्रेसचे नुकसान होणार की भाजपाचे; काय म्हणाले प्रशांत किशोर?

224

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मद्य घोटाळ्यात जामीन मिळाल्याने आता ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र इंडी आघाडीचा घटक पक्ष असलेले केजरीवाल यांच्या आपने पंजाबमध्ये काँग्रेससोबत पाठिंबा दिला नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी केजरीवाल हे कारागृहातून बाहेर पडल्यामुळे भाजपाऐवजी काँग्रेसला नुकसान होणार आहे, असे म्हटले.

(हेही वाचा नाशकात ठाकरे गट-शिंदे गट आमनेसामने; CM Eknath Shinde यांच्या रोड शो वेळी दोन्ही गटाकडून घोषणाबाजी)

पंजाबमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहणार

केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) हा इंडी आघाडीचा भाग आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आप सोबत निवडणूक लढवत आहेत. मात्र, पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आप संपूर्ण भारतभरात 13 जागा पंजाबमध्ये 7 जागा दिल्लीत तर एक जागा गुजरातमध्ये लढवत आहे. यामुळे केजरीवाल (Arvind Kejriwal) बाहेर आल्याने जो काही बदल होणार तो केवळ याच जागांवर होईल. यांपैकी पंजाबच्या 13 जागांवर आप आणि काँग्रेस यांच्यात थेट फाइट आहे. येथे जर आपला फायदा झाला, तर नुकसान काँग्रेसचेच होईल. पंजाबमध्ये भाजपही निवडणूक लढवत आहे. मात्र आपची खरी फाईट काँग्रेससोबत आहे. 2019 मध्ये, भाजपने पंजाबमध्ये गुरदासपूर आणि होशियारपूरमध्ये विजय मिळवला होता. यावेळी भाजपने राज्यातील सर्वच्या सर्व 13 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मनोबल वाढेल. मात्र ते पंजाब आणि दिल्ली व्यतिरिक्त बाहेरील मतदारांच्या भावनांना प्रभावित करू शकणार नाहीत, असे प्रशांत किशोर म्हणाले.indi

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.