Sadabhau Khot : सदाभाऊंना पुन्हा ‘आमदार’ झाल्यासारखं वाटतंय?; आमदारकी गेल्यानंतरही विधानपरिषदेच्या लेटरहेडचा वापर

विशेष म्हणजे त्यावर 'सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद' असा उल्लेख असून, महाराष्ट्र विधानपरिषदेचा लोगो आणि चिन्ह मुद्रांकीत केलेले आहे.

144
Sadabhau Khot : सदाभाऊंना पुन्हा 'आमदार' झाल्यासारखं वाटतंय?; आमदारकी गेल्यानंतरही विधानपरिषदेच्या लेटरहेडचा वापर

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना पुन्हा ‘आमदार’ झाल्यासारखं वाटतंय की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण आमदारकीची टर्म संपल्यानंतरही त्यांच्याकडून विधानपरिषदेच्या लेटरहेडचा सर्रास वापर सुरू असून, कहर म्हणजे, ‘विधानपरिषद सदस्य सदाभाऊ रामचंद्र खोत’ (Sadabhau Khot) असा ठळक नामोल्लेख असलेले पत्र त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

(हेही वाचा – Nitesh Rane : संजय राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते – नितेश राणे)

मंत्रिपद किंवा आमदारकीची टर्म संपल्यानंतर नेतेमंडळी लेटरहेडवर माजी मंत्री किंवा माजी आमदार असा उल्लेख करतात. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) २०१६ मध्ये विधानपरिषदेचे आमदार झाले. २०२२ मध्ये त्यांची आमदारकीची टर्म संपली. जून २०२२ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपाच्या सूचनेनुसार त्यांनी आधी उमेदवारी अर्ज भरला आणि शेवटच्या क्षणी मागे घेतला. त्यामुळे ते आता फक्त माजी आमदार राहिले आहेत.

हेही पहा – 

असे असतानाही त्यांच्याकडून (Sadabhau Khot) जुन्या कार्यकाळतील लेटरहेडचा सर्रास वापर सुरू आहे. विशेष म्हणजे त्यावर ‘सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद’ असा उल्लेख असून, महाराष्ट्र विधानपरिषदेचा लोगो आणि चिन्ह मुद्रांकीत केलेले आहे. मंगळवारी, १० मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी (Sadabhau Khot) धडक मोर्चासंदर्भात जे इशारा वजा पत्र लिहिले, त्यावरही असाच उल्लेख आहे (त्याची प्रत ‘हिंदुस्थान पोस्ट’कडे आहे). त्यामुळे विधिमंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खोत यांच्यावर कोणती कारवाई होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

New Project 2023 05 17T124642.375

पत्रात काय?

आम्ही रयत क्रांती संघटना, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना एकत्रीतपणे काही मागण्या मांडत आहोत. त्यांचा सहनभूतीपूर्वक विचार न केल्यास राज्यातील शेतकऱ्यांना घेऊन सोमवार २२ मे २०२३ रोजी कराड ते सातारा पदयात्रा काढणार असून पुढे सातारा ते मंत्रालय मुंबई असा लक्षवेधी मोर्चा काढणार आहोत, असा इशारा सदभाऊ खोत यांनी पत्रातून दिला आहे. (Sadabhau Khot)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.