Ajit Pawar : गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचेही फोटो आहेत.

223
Ajit Pawar : गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) ४० आमदारांसह भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांच्याबद्दलच्या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही आहेत. अशातच आता एका जाहिरातीमुळे दुसऱ्या नव्या चर्चेने जोर धरला आहे. भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या या जाहिरातीत चक्क अजित पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : “अजित पवार यांना सगळं माफ…” नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेला उधाण)

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा बुधवार १७ मे रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका दैनिकात महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी जाहिरात छापण्यात आली आहे. या जाहिरातीत अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोटो छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोटोत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचाही फोटो आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हेही पहा – 

या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचेही फोटो आहेत. पण या सर्वांच्या फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे. फडणवीस यांचा फोटोही छोटा छापण्यात आला आहे. मात्र, अजितदादांचा मोठा फोटो छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एवढेच नव्हे तर अजितदादांच्या (Ajit Pawar) फोटोखाली ‘जिवाभावाचा माणूस’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.