Rahul Gandhi पंतप्रधान पदाचे उमेदवार? Shiv Sena UBT ची अप्रत्यक्ष कबुली

एका सांगलीसाठी देशाचे पंतप्रधानपद काँग्रेस घालवणार आहे का?, Sanjay Raut यांचा सवाल.

150
Rahul Gandhi पंतप्रधान पदाचे उमेदवार? Shiv Sena UBT ची अप्रत्यक्ष कबुली
  • सुजित महामुलकर

शिवसेना उबाठा गटाकडून आज गुरुवारी २८ मार्चला राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून किंवा इंडी आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशी अप्रत्यक्षपणे कबुलीच दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, अशी थेट लढत होणार का? असा सवाल केला जात आहे. तर गांधी यांचे नाव उघडपणे घेतल्यास मते मिळणार नाहीत, याची खात्री असल्याने इंडी आघाडीकडून गांधी याचे नाव जाहीरपणे घेण्यात येत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Rahul Gandhi)

काँग्रेसचा उबाठाच्या मनमानीविरुद्ध आवाज

शिवसेना उबाठा गटाचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत सांगली मतदार संघावरून सुरू असलेल्या महाविकास आघाडीतील वादावर भाष्य करताना, “काँग्रेस सांगलीसाठी पंतप्रधान पद घालवणार का?” असा प्रश्न केला. काँग्रेसने उबाठाच्या मनमानीविरुद्ध आवाज उठवत सांगली जागेसाठी आग्रह धरला आहे. उबाठाने सांगलीत परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आणि हा विषय थेट हायकमांडपर्यंत पोहचवला. यावर अद्याप निर्णय झाला नाही. मात्र काँग्रेसने उबाठा उमेदवारावर बहिष्कार घालण्याची भाषा केली आहे. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – IPL 2024 MI vs SRH : आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या पाच सर्वोच्च धावसंख्या)

…तर त्याला जबाबदार कोण?

आज पत्रकारांनी यावर प्रश्न केला असता राऊत यांनी काँग्रेसचे नाव न घेता आरोप केला. “काही व्यक्तिगत कारणांमुळे, कुणाला भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करुन काही वेगळे घडवायचे असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही. कुणी बहिष्काराची भाषा करत असेल तर महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. जर संपूर्ण महाराष्ट्रात, देशात असे चित्र निर्माण झाले तर त्याला जबाबदार कोण असेल?” असा सवालही राऊत यांनी करून काँग्रेसला अडचणीत आणले. (Rahul Gandhi)

पंतप्रधान काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका

राऊत पुढे म्हणाले, “काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचे नेतृत्व काँग्रेसला करायचे आहे असे आम्ही मानतो, आम्हाला करायचे नाही. पंतप्रधान काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एका सांगलीसाठी देशाचे पंतप्रधानपद काँग्रेस घालवणार आहे का? हा विचार त्यांनी करायचा आहे,” असे सांगून राऊत यांनी गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे संकेत दिले. काँग्रेस पक्षात पंतप्रधान पदासाठी दुसरे कुठलेही नाव पुढे आले तर पक्षांतर्गत विरोध होणार हे नक्की. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्याशिवाय पंतप्रधान पद अन्य कुणालाही दिले जाणार नाही, अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही व्यक्त केली जात आहे. (Rahul Gandhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.