IPL 2024 MI vs SRH : आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या पाच सर्वोच्च धावसंख्या

IPL 2024, MI vs SRH : सनरायझर्स हैद्राबादने स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावावर केलाय. 

131
IPL 2024 MI vs SRH : आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या पाच सर्वोच्च धावसंख्या
  • ऋजुता लुकतुके

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात बुधवारी जसप्रीत बुमरालाही मार बसला. त्याच्या गोलंदाजीवरही षटकार खेचला गेला. आणि ९ च्या धावगतीने त्याने ३६ धावा दिल्या. मग इतर मुंबई इंडियन्स गोलंदाजांची चर्चाच नको. वस्तुस्थिती ही होती की, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि शेवटी हेनरिच क्लासेनने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. आणि मुंबईच्या एकाही गोलंदाजाला दाद दिली नहाी. शेवटी रोहित शर्माने वैतागून शेवटच्या षटकांत गोलंदाजीतील बदल आणि क्षेत्ररक्षण आपल्या हातात घेतलं. (IPL 2024 MI vs SRH)

पण, त्याचाही उपयोग झाला नाही. आणि हैद्राबाद संघाने ३ बाद २७७ अशी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्या निमित्ताने स्पर्धेतील पहिल्या ५ सर्वोच्च धावसंख्यांवर नजर टाकूया, (IPL 2024 MI vs SRH)

सनरायझर्स हैद्राबाद ३ बाद २७७ (२०२४)

ट्रेव्हिस हेडच्या २४ चेंडूंत ६३ आणि अभिषेक शर्माच्या २४ चेंडूंत ६४ या खेळींमुळे हैद्राबादने सुरुवातच दणक्यात केली. आणि पुढे दोघंही थांबण्याचं नाव घेत नव्हते. ११ व्या षटकांतच दोघांनी धावसंख्या १६० च्या पार नेली होती. आणि हे कमी होतं म्हणून की काय, पाचव्या क्रमांकावर आलेल्या हेनरिच क्लासेनने ३४ चेंडूंत ८० धावा केल्या. आणि सनरायझर्स हैद्राबादने ३ बाद २७७ धावा केल्या. त्यांनी १८ षटकारांची आतषबाजी केली. प्रत्युत्तरादाखल मुंबईनेही ५ बाद २४६ धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा ५०० धावा पार झाल्या. (IPL 2024 MI vs SRH)

(हेही वाचा – Savitri Jindal : काँग्रेसला मोठा झटका; देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी दिला राजीनामा)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ५ बाद २६३ (२०१३)

पुणे वॉरिअर्स संघाविरुद्धच्या त्या सामन्यात ख्रिस गेलच्या अंगात काय संचारलं होतं कुणास ठाऊक? त्याला वादळ ही उपाधी मिळाली ती याच सामन्यातून. त्याने चक्क एकट्याने ६६ चेंडूंत १७५ धावा केल्या. आणि तो शेवटपर्यंत बाद झाला नाही. अखेर बंगळुरूने ५ बाद २६३ अशी धावसंख्या उभारली. त्याने या खेळी दरम्यान १७ षटकार लगावले होते. आजही आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात वेगवान शतक आहे. पुण्यावर या सामन्यात बंगळुरूने १३० धावांनी विजय मिळवला. (IPL 2024 MI vs SRH)

लखनौ सुपरजायंट्स ५ बाद २५७ (२०२३)

गेल्या हंगामातील हा सामना होता लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज. या सामन्यात मार्कस स्टॉईनिसच्या ७८ धावा ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती. पण, त्याला काईल मायर्स (५४), आयुष बदोनी (४३) आणि निकोलस पुरन (४५) यांनी दमदार साथ दिली. (IPL 2024 MI vs SRH)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : महाराष्ट्रातील आठ जागांसह १२ राज्यांमधील ८९ लोकसभा जागांसाठी अधिसूचना जारी)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३ बाद २४८ (२०१६)

बंगळुरू संघाकडे सुरुवातीपासून घणाघाती फलंदाजी करू शकणारे फलंदाज आहेत. ख्रिस गेल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स हे त्यातलेच काही. त्यामुळे सर्वोच्च धावसंख्येच्या बाबतीत हा संघ सातत्यपूर्ण आहे. २०१६ मध्ये गुजरात लायन्स संघाविरुद्ध त्यांनी २४८ धावा केल्या होत्या. या सामन्यात गेल झटपट बाद झाला. पण, त्यानंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स या खेळाडूंनी चिन्नास्वामी मैदानावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी उचलली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी २२९ धावांची भागिदारी केली. आणि संघाला २४८ ही धावसंख्या उभारून दिली. कोहलीने १०९ तर डिव्हिलिअर्सने १२९ धावा केल्या. गुजरातच्या संघाला फक्त १०४ धावा करता आल्या. (IPL 2024 MI vs SRH)

चेन्नई सुपरकिंग्ज ५ बाद २४६ (२०१०)

पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने एकदा अडिचशे धावांच्या जवळ मजल मारली होती. २०१० मध्ये मुरली विजय हा त्यांचा आघाडीचा फलंदाज चांगलाच फॉर्मात होता. आणि त्याने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध १२७ धावांची खेळी साकारली. आणि त्याचवेळी त्याने संघालाही ५ बाद २४६ अशी धावसंख्या गाठून दिली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनीही चेन्नईला चोख प्रत्युत्तर दिलं. आणि नमन ओझाच्या ९४ आणि शेन वॉटसनच्या ६० धावांमुळे त्यांनी २२४ धावांची मजल मारली. पण, अखेर २० धावा त्यांना कमीच पडल्या. (IPL 2024 MI vs SRH)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.