PM Modi Chandrapur : कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा, हेच इंडि आघाडीचे धोरण; पंतप्रधानांची सडकून टीका

PM Modi Chandrapur : यंदाची निवडणूक स्थिरता आणि अस्थिरता यांच्यातील निवडणूक आहे. एका बाजूला NDA आहे. देशासाठी मोठे आणि कठोर निर्णय घ्या, दुसऱ्या बाजूला इंडि आघाडी आहे. इंडि आघाडीने आपल्याला नेहमी अस्थिर केले आहे. स्थिर सरकार किती महत्त्वाचे आहे, हे महाराष्ट्राशिवाय चांगले कोण जाणू शकते.

98
PM Modi Chandrapur : कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा, हेच इंडि आघाडीचे धोरण; पंतप्रधानांची सडकून टीका
PM Modi Chandrapur : कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा, हेच इंडि आघाडीचे धोरण; पंतप्रधानांची सडकून टीका

इंडि आघाडीवाले (India Alliance) राज्यात वेगवेगळ्या क्लृपत्या लढवून सत्तेत आले, तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. कुणाचा किती वाटा असेल, कुणाला कोणते कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच यांनी पूर्ण महाराष्ट्राचे भविष्य गुरफटून टाकले होते. त्यांनी केवळ परिवाराचाच विकास केला. मलाईदार पोस्ट कोणाच्या खात्यात येईल, याचाच विचार केला. कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा, असे इंडि आघाडीचे धोरण आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला. ते चंद्रपूर येथील भाजपच्या महाराष्ट्रातील पहिल्या सभेत बोलत होते. (PM Modi Chandrapur)

(हेही वाचा – Sudhir Mungantiwar : मतदान देशीसाठी नाही तर देशासाठी करा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन)

स्थिरता आणि अस्थिरता यांच्यातील निवडणूक

पंतप्रधान पुढे म्हणाले की, यंदाची निवडणूक स्थिरता आणि अस्थिरता यांच्यातील निवडणूक आहे. एका बाजूला NDA आहे. देशासाठी मोठे आणि कठोर निर्णय घ्या, दुसऱ्या बाजूला इंडि आघाडी आहे. इंडि आघाडीने आपल्याला नेहमी अस्थिर केले आहे. स्थिर सरकार किती महत्त्वाचे आहे, हे महाराष्ट्राशिवाय चांगले कोण जाणू शकते. महाराष्ट्रातील आधीच्या सरकारने जलयुक्त शिवार, बळीराजा जलसंजीवनी योजना, समृद्धी महामार्गाला विरोध केला. कोकणात रिफायनरीला विरोध केला. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित कोणताही प्रोजेक्ट पाहिल्यावर हे म्हणायचे की, कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा.

तेव्हा लोकमान्य टिळक स्वस्थ बसले असते का ?

इंडि आघाडीवाले सनातनला डेंग्यू, मलेरिया म्हणून कमी लेखत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे की, मोदी अन्य राज्यांत जाऊन काश्मीरचे कलम ३७० विषयी का सांगतात ? काश्मीरविषयी ही भाषा आपल्याला मंजूर आहे का ? पंजाबमध्ये जलियनवाला बाग हत्याकांड चालू असतांना लोकमान्य टिळक स्वस्थ बसले असते का ?, असा प्रश्नही पंतप्रधानांनी या वेळी उपस्थित केला. (PM Modi Chandrapur)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.