Sudhir Mungantiwar : मतदान देशीसाठी नाही तर देशासाठी करा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधकांना खोचाक टोले

110
Sudhir Mungantiwar : मतदान देशीसाठी नाही तर देशासाठी करा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
तुम्हाला मतदानानंतर बोटाला शाईचा थेंब लागतो त्यासाठी हुतात्मांचे योगदान आहे, लक्षात ठेवा तुमचे मतदान देशीला नाही तर देशासाठी करा, असे आवाहन चंद्रपूर येथील लोकसभा (Lok Sabha at Chandrapur) निवडणुकीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रचारसभेतून केले. (Sudhir Mungantiwar)

काय म्हणाले मुनगंटीवार? 

आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे, अशी  घोषणा द्या कि देशाच्या शत्रूला कापरे भरले पाहिजे. काँग्रेसवाल्यांनी नार्को टेस्ट (Congress Narko Test) केली तर तोही म्हणतो नरेंद्र मोदीच पंतप्रधान होती. अबकी बार ४०० पार, काँग्रेसला मत म्हणजे विनाशाला मत, गुंडागर्दीला मत आहे. मुनगंटीवार यांचे डिपॉझिट जप्त करणार म्हणाले, माझे डिपॉझिट सर्व सामान्यांनी घामाचे पैसे देऊन डिपॉझिट भरले आहे, हे दारू विकून जमवलेले पैसे नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) जरी पदयात्रा केली तरी आमचे डिपॉझिट जप्त होणार नाही ऑलिम्पिकमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा असेल तर दर ऑलिम्पिकमध्ये राहुल गांधी यांना मेडल मिळेल. इथे काँग्रेसने रेवंत रेड्डी यांचा सोशल मीडिया आणला आहे, इथे आणण्यापेक्षा राहुल गांधी यांना अमेठीत उभे करा आणि तिथे रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया न्या, असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी हाणला. मी कधी बनवाबनवीचे राजकरण केले नाही, मी विकासाचे राजकारण केले, जाती उंबरठ्याच्या आत असतात.

(हेही वाचा – Fatepur : अकबराच्या शाही शहराचे पहिले नाव ‘फतेहपुर’; चला जाणून घेऊयात रंजक गोष्टी )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव विसरलात का ?

देशाची निर्मिती करायची असेल तर तुम्हाला जात कशी आठवते? मी निवडून आलो तर संसदेत या वाघाच्या भूमीचा आवाज संपूर्ण देश ऐकेल, मी वाचन देतो कधीच जातीचे राजकारण करणार नाही. निवडणूक विकासावर होऊद्या, या जिल्ह्यात  हुकूमशाहीविरुद्ध लोकशाहीचा लढा असे बोर्ड लावतात, आणीबाणी मोदींनी लावली होती का?, असेही मुनगंटीवार म्हणाले  संविधान भाजप बदलणार हा खोटा प्रचार करत आहेत, तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात म्हणालात, सत्ता आल्यावर संविधानात बदल करून आरक्षण देऊ असे, तुम्हीच संविधान बदलणार आहात, १९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr Babasaheb Ambedkar) यांचा पराभव केला, विसरलात का, असेही मुनगंटीवार म्हणाले.

हेही पाहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.