Gautam Buddha : कठोर तपश्चर्या करून दैवी ज्ञान प्राप्त करणारे गौतम बुद्ध

106
Gautam Buddha : कठोर तपश्चर्या करून दैवी ज्ञान प्राप्त करणारे गौतम बुद्ध
Gautam Buddha : कठोर तपश्चर्या करून दैवी ज्ञान प्राप्त करणारे गौतम बुद्ध
गौतम बुद्ध हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. गौतम बुद्धांनी भारतीय तत्वज्ञानात महत्वाची भर घातली आहे. त्यांचा जन्म इक्ष्वाकु वंशातील क्षत्रिय शाक्य कुळातील राजा शुद्धोधन याच्या घरी इ.स.पूर्व ५६३ मध्ये लुंबिनी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते, जी कोलिया घराण्यातील होती, त्यांच्या जन्मानंतर सात दिवसांनी आईचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात राणीची धाकटी बहीण महाप्रजापती गौतमीने बुद्धांचे (Gautam Buddha) पालनपोषण केले.
बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त
वयाच्या २९ व्या वर्षी विवाहानंतर मुलगा राहुल आणि पत्नी यशोधरा यांचा करुन सिद्धार्थ दैवी ज्ञानाच्या शोधात आणि जगाला मार्ग दाखवण्यासाठी  राजत्वाची आसक्ती सोडून ते रात्री जंगलाकडे निघून गेले. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर, बोधगया (बिहार) येथील बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि ते सिद्धार्थ गौतमपासून भगवान बुद्ध झाले. इतिहासकार पं. कोटा वेंकटचलम यांच्या मते, गौतम बुद्धांचा जन्म इ.स.पू. १८८७ मध्ये झाला आणि इ.स.पू. १८०७ मध्ये त्यांचा महापरिनिर्वाण झाला.
गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना केली. बुद्धांचे पहिले गुरू आलेर कलाम होते, ज्यांच्याकडून त्यांनी संन्यासाच्या काळात शिक्षण घेतले. वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत होते. बुद्धांनी बोधगया येथील निरंजना नदीच्या काठी कठोर तपश्चर्या केली आणि सुजाता नावाच्या मुलीच्या हातची खीर खाऊन उपवास सोडला.
मित्रांना बनवले अनुयायी
वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत त्यांनी पाली या लोकभाषेत आपल्या धम्माचा प्रचार केला. धम्माची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली. चार आठवडे बोधीवृक्षाखाली राहून धर्माच्या स्वरूपाचे चिंतन केल्यावर बुद्ध धर्म उपदेश करण्यासाठी निघाले. आषाढच्या पौर्णिमेच्या दिवशी ते काशीजवळील मृगदव (सध्याचे सारनाथ) येथे पोहोचले. तेथे त्यांनी प्रथम प्रवचन दिले आणि पहिल्या पाच मित्रांना आपले अनुयायी बनवले आणि नंतर त्यांना धर्म प्रचारासाठी पाठवले. महाप्रजापती गौतमी (बुद्धाची आई) यांना प्रथम बौद्ध धर्मात प्रवेश मिळाला. आनंद हे बुद्धांचे आवडते शिष्य होते. बुद्ध केवळ आनंदला उद्देशून प्रवचन देत असत, असे म्हटले जाते.
पाली सिद्धांताच्या महापरिनिर्वाण सुत्तानुसार, वयाच्या ८० व्या वर्षी बुद्धांनी घोषणा केली की, ते लवकरच परिनिर्वाणासाठी निघतील. बुद्धांनी कुंदा नावाच्या लोहाराने दिलेले त्यांचे शेवटचे अन्न खाल्ले.  बुद्धाच्या उपदेशामुळे भिक्षूंची संख्या वाढू लागली. मोठमोठे राजे, सम्राटही त्यांचे शिष्य होऊ लागले. भिक्षूंची संख्या खूप वाढल्याने बौद्ध संघाची स्थापना झाली. परदेशात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात अशोकासारख्या सम्राटांचीही महत्त्वाची भूमिका होती. मौर्य काळापर्यंत बौद्ध धर्म भारतातून चीन, जपान, कोरिया, मंगोलिया, ब्रह्मदेश, थायलंड, भारत-चीन, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये पसरला होता. (Gautam Buddha)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.