CM Eknath Shinde : काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफीनामा जाहीर करायला पाहिजे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

काँग्रेसच्या ५० वर्षांच्या काळात जेवढी कामे झाली नाहीत ती कामे मोदींच्या कार्यकाळात झाली. त्यामुळे काँग्रेसला ५० वर्षांचा हिशेब मागायला पाहिजे.

112
cm eknath Shinde काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफीनामा जाहीर करायला पाहिजे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची पहिली सभा चंद्रपूर (Chandrapur) येथे होत आहे, हा योगायोग नाही तर विजयाची नांदी आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) विक्रमी मतांनी विजयी होतील आणि मोदी हॅट्ट्रिक करतील, १४० कोटी जनता ‘फिर एक बार मोदी सरकार’ (Fir ek bar modi Sarkar) म्हणत आहे. देशात मोदी गॅरेंटी चालत आहे. युपीएच्या काळात आपला देश असुरक्षित होता, भ्रष्टाचार, घोटाळ्यामध्ये गुरफटलेला होता. मोदींच्या कारकिर्दीत विकासाचा जोश पाहायला मिळत आहे. म्हणून काँग्रेसच्या ५० वर्षांच्या काळात जेवढी कामे झाली नाहीत ती कामे मोदींच्या कार्यकाळात झाली. त्यामुळे काँग्रेसला ५० वर्षांचा हिशेब मागायला पाहिजे. खरेतर काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफीनामा जाहीर करायला पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (CM Eknath Shinde)

( हेही वाचा – Gautam Buddha : कठोर तपश्चर्या करून दैवी ज्ञान प्राप्त करणारे गौतम बुद्ध)

महाराष्ट्रात ४५ पार असा संकल्प करूया

चंद्रपूरचे उमेदवार (Chandrapur Lok Sabha 2024) सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मोदी है तो मुमकीन है, जे कधी थांबत नाही, जे कधी थकत नाही असे नेतृत्व मिळाले आहे, जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख नरेंद्र मोदींचा सन्मान करत आहेत. त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा, त्यांच्याकडे करप्शन फस्ट आपल्याकडे नेशन फस्ट आहे. त्यामुळे ज्यांनी या देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने नेला आहे त्यांना निवडणूक आणायचे आहे अबकी बार ४०० पार (Abaki Bar 400 Par) आणि महाराष्ट्रात ४५ पार असा संकल्प करूया. सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांना निवडून आणा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.