Nagpur Rain: नागपुरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट!

79
Nagpur Rain: नागपुरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट!
Nagpur Rain: नागपुरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट!

राज्याच्या वातावरणात कुठे ऊन तर कुठे पाऊस पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात उन्हाळ्याची तीव्रता (Heat Wave) वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने (Nagpur Rain) हजेरी लावली आहे. उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २३ रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली असून, पुण्यातही सात रुग्ण आढळून आले आहेत. अशातच, नागपूरमध्ये सकाळी जोरदार पावसानं (Nagpur Rain) हजेरी लावली. तासाभरात नागपूरमध्ये 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळी निरभ्र आकाश आणि चांगलं ऊन होतं. मात्र, नऊ वाजता अचानकच वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी नागपूरचा आकाश व्यापून टाकलां. त्यामुळं साडेनऊ वाजता नागपुरात संध्याकाळ व्हावी असा अंधार पसरला होता. सव्वानऊ वाजल्यापासून सुमारे एक तास नागपुरातील (Nagpur Rain) वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून खाली पडल्या आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाहनांवर पडल्या आहेत. त्यामुळं वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. (Nagpur Rain)

(हेही वाचा –Devendra Fadnavis: पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील: फडणवीसांचा पलटवार)

दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन तासात पुन्हा नागपुरात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भंडाऱ्यात (Bhandara) जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासून मेघ दाटून आल्याने सर्वत्र काळोख पसरला आहे. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी जोरदार पावसाचा जिल्ह्यातील 157 गावातील 1519.50 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. (Nagpur Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.