Devendra Fadnavis : मातृशक्तीला कोणी थांबवू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चंद्रयान चंद्रावर उतरले आहे. त्यांच्याच आशीर्वादाने चंद्रपूरचे यान थेट संसदेत उतरेल, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

178
Devendra Fadnavis : मातृशक्तीला कोणी थांबवू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा
Devendra Fadnavis : मातृशक्तीला कोणी थांबवू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा

राहुल गांधींनी शक्तीला आव्हान दिले आहे. आम्ही ज्या मातेच्या उदरातून जन्माला आलो, ती मातृशक्तीच आहे. या शक्तीला कोणी रोखू शकत नाही, हे आमचे राहुल गांधींना आव्हान आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रपूर येथील सभेत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा पार पडली. या वेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभेचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आदी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफीनामा जाहीर करायला पाहिजे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात)

चंद्रपूरचे यान थेट संसदेत उतरेल

या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चंद्रयान चंद्रावर उतरले आहे. त्यांच्याच आशीर्वादाने चंद्रपूरचे यान थेट संसदेत उतरेल. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा कायापालट केला आहे. त्यामुळे त्यांना आता दिल्लीत पाठवा,असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

त्यांच्याकडे करप्शन फस्ट

चंद्रपूरचे उमेदवार (Chandrapur Lok Sabha 2024) सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संबोधित केले. मोदी है तो मुमकीन है, जे कधी थांबत नाही, जे कधी थकत नाही असे नेतृत्व मिळाले आहे, जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख नरेंद्र मोदींचा सन्मान करत आहेत. त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा, त्यांच्याकडे करप्शन फस्ट आपल्याकडे नेशन फस्ट आहे. त्यामुळे ज्यांनी या देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने नेला आहे त्यांना निवडणूक आणायचे आहे अबकी बार ४०० पार (Abaki Bar 400 Par) आणि महाराष्ट्रात ४५ पार असा संकल्प करूया. सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांना निवडून आणा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.