Girish Mahajan : लायकी काढणाऱ्या संजय राऊतांना गिरीश महाजनांची चपराक; म्हणाले…

146

उबाठा गटाचे संजय राऊत हे एकाचवेळी भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवरही टीका करण्याचे सोडत नाहीत. वंचितशी चर्चांवेळी तर त्यांनी टीका केलीच होती. अशातच आता भाजपाचे नेते मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी राऊतांना प्रत्यूत्तर दिले आहे. संजय राऊत बोलत होते याची लायकी काय? मी म्हटले अरे वेड्या मी सात वेळेस निवडून आलो आहे. तुम्ही फक्त एकदा उभे राहा, महाराष्ट्रातला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा. तेथे उभे राहा निवडून येवून दाखवा, असा घणाघात भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला.

(हेही वाचा Sudhir Mungantiwar : मतदान देशीसाठी नाही तर देशासाठी करा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन)

घरातून उठले की सकाळी कोंबड्या सारखी बांग देत बसतात. मला काय सांगता, आमची लायकी काय? आम्ही सात-सात वेळा एकाच मतदार संघातून निवडून येतो. तुम्ही आयते राज्यसभेवर जाता आणि आम्हाला लायकी शिकवता का, अशी बोचरी टीका महाजन (Girish Mahajan) यांनी राऊतांवर केली आहे.

(हेही वाचा MNS : मनसे महायुतीत येणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…)

एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकी, खासदारकीची. निवडणूक लढवून दाखव मग आम्हाला सांग आमची लायकी काय आहे, असे खुले आव्हान महाजन (Girish Mahajan) यांनी दिले. महाजन हे नांदेड येथील प्रचारसभेत बोलत होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.