नगरसेवक म्हणतात, मार डाला! कर्मचारी कमी आणि पक्ष कार्यालय बंद करण्याची आली वेळ…

113

मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने नगरसेवकांना आता कार्यालय आणि कर्मचारी सांभाळणे ही कठीण झाले आहे. नगरसेवक नसल्याने महापालिकेची कोणतीही कामे करता येत नाहीत. त्यामुळे आजवर जनतेच्या सेवा सुविधांसाठी उघडलेली ही कार्यालय आता कर्मचाऱ्यांचे पगार आणि कार्यालयांचा मासिक भाडे देणेही शक्य नसल्याने अनेक नगरसेवकांनी आपली कार्यालय बंद करून कर्मचाऱ्यांनाही घरी पाठवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आज शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : मुंबई आणि कन्याकुमारी दरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणार विशेष ट्रेन; जाणून घ्या सविस्तर)

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असून प्रत्यक्षात निवडणूक कधी होईल याबाबतची अद्याप शाश्वती नाही. मुंबई महापालिका ७ मार्च २०२२ रोजी बरखास्त झाल्यानंतर महापालिकेत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रथम ही निवडणूक नोव्हेंबर २०२२पर्यंत होईल. पण त्यानंतर फेब्रुवारी २०२४ पर्यंत होईल असे असतानाच न्यायालयाने पुढची तारीख दिल्याने फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होण्याची शक्यता धूसर झाली आहे. महापालिका बरखास्त झाल्यानंतर कसा बसा ९ महिन्याचा वेळ मारून नेला असला तरी आता कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च सोसला जात नाही.

नगरसेवक नसतानाही अनेक पक्षांच्या नगरसेवकांनी आपली कार्यालये आणि कर्मचारीवृंद हा कायम ठेवला. परंतु आता फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता कमी असल्याने आणि आगामी नोव्हेंबर 2023 पर्यंत या निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने अखेर नगरसेवकांनी आपली राजकीय पक्षांची कार्य हळूहळू बंद करण्याचा निर्धार केला आहे. कार्यालयाचे मासिक भाडे परवडत नसल्याने त्यांनी आतापासूनच कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असून महापालिकेच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या स्वीय सहाय्यक व कार्यालयीन कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनाही आता घरी बसवण्याच्याही निर्धार केला आहे. तसेच बऱ्याच नगरसेवकांनी आपली कार्यालय बंद करून कर्मचारीही कमी केला आहे.

मुंबईमध्ये सर्व प्रभागांमध्ये शिवसेनेच्या शाखा असून या शाखांचा केंद्रबिंदू स्थानी शाखाप्रमुख असतात आणि या शाखांमध्ये नगरसेवक बसत असतात. परंतु भाजप, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समाजवादी पक्ष यांच्या नगरसेवकांची कार्यालय आहेत आणि या संपर्क कार्यालयातूनच पक्षाचा कार्यभाग चालवला जातो परंतु आता नगरसेवक नसल्याने ही कार्यालय पुढे चालू ठेवणे आता त्यांना जिकरीचे जात आहे. त्यामुळे मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये इतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांची कार्यालय हळूहळू बंद होताना दिसणार आहेत. केवळ शिवसेनेची कार्यालये ही शाखाप्रमुख नियुक्त असल्याने केवळ उघडी असलेली पाहायला मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप आपल्या नगरसेवकांना ही कार्यालय सुरू ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवते का? किंवा नव्याने स्थापन झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शाखा मुंबईत खुल्या होतात का? याकडे सर्वाचे लक्ष आहे. दुसरीकडे मनसेने संपूर्ण मुंबईमध्ये आपल्या शाखा निर्माण केल्या होत्या, परंतु मागील काही निवडणुकीमध्ये या पक्षाला वारंवार मिळणारे अपयश आणि त्यांचे पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याने अनेक शाखा बंद झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मनसेच्या शाखा पुन्हा उघडल्या गेल्यास जनतेला आपल्या नागरी समस्या मांडण्यास शिवसेनेशिवाय पर्याय निर्माण होईल, असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.