Narayan Rane: उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात; नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात

108
Narayan Rane: उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात; नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात
Narayan Rane: उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात; नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गद्दार (Narayan Rane) आहेत. २०१९ ला मोदींचं नाव सांगून मत मागितली. शरद पवारांसोबत (Sharad Pawar) गेल्यावर शिवसेनेची (Shivsena) काय अवस्था झालीय, शरद पवारांना शिवसेना संपवायची होती. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही, पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोनिया गांधींना (Sonia Gandhi) मुजरा करतात. असं म्हणत नारायण राणे  यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचं चॉकलेट दिलं

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गद्दार आहेत, २०१९ ला मोदींचं नाव सांगून मत मागितली. मोदींच्या नावावर खासदार आणि आमदार निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विनंत्या केल्या, मग संधी साधली शरद पवारांनी, त्यांना शिवसेना संपवायची होती, त्यांनी मुख्यमंत्री पदाचं चॉकलेट उद्धव ठाकरे यांना दिलं. शिपाई होऊ शकत नाहीत,त्यांना मुख्यमंत्री करतो म्हटल्यावर बाळासाहेबांचं कर्तृत्व सोडलं आणि राष्ट्रवादी काँगेस बरोबर सरकार स्थापन केलं.” (Narayan Rane)

उद्धव ठाकरे नकली, विकले जाणारे

“शरद पवारांसोबत गेल्यावर शिवसेनेची काय अवस्था झालीय. डोळ्यासमोरून ४० आमदार गेले, काही करू शकले नाहीत. बाळासाहेबांची असली शिवसेना होती, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीच नकली शिवसेना आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही. उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात. खरे बाळासाहेब, हिंदुत्व, अभिमान, त्याग करणारे होते. उद्धव ठाकरे नकली, विकले जाणारे.” (Narayan Rane)

उद्धव ठाकरे सायकिक केस

“पंतप्रधान मोदींना एका व्यासपीठावर बोलावत, काय काम केलं ते सांगतो म्हणणारे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले हे त्यांचं काम. मोदींनी केलेल्या कामांची यादी पत्रकारांना दया, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदींनी काय केलं असं विचारलं की तोंडावर मारा. उद्धव ठाकरे सायकिक केस आहे.” अशी खोचक टीका राणेंनी केली आहे. (Narayan Rane)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.